शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा गाव अखेर झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे गेल्या २५ एप्रिलपासून ते आजपावेतो म्हणजे १२ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह निघालेला ...

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे गेल्या २५ एप्रिलपासून ते आजपावेतो म्हणजे १२ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह निघालेला नाही. ही गावासाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य, पोलीस व शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे सार्थक झाले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत प्रकाशा येथे कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. ९ सप्टेंबर २०२० रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येत वाढ झाली होती. गेल्यावर्षी गावात १०९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी म्हणजे १ जानेवारी २०२१ ते २५ एप्रिल २०२१ पर्यंत ९५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत २०४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

२५ एप्रिलपासून प्रकाशा गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. ही गावासाठी शुभ वार्ता आहे. आता मात्र गावाने सतर्कता ठेवली आहे. ग्रामस्थांनीही केलेले सहकार्य, वेळोवेळी झालेल्या लॉकडाऊनला ग्रामस्थांनी चांगलीच साथ दिली. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. अजूनही जर प्रकाशेकरांनी संयम ठेवला तर नक्कीच पुढचे दिवस चांगले येतील, यात शंका नाही.

प्रकाशा ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय

ग्रामपंचायतीने वेळोवेळी स्वतः निर्णय घेऊन गावात सातवेळा लॉकडाऊन केले आहे. पाचवेळा गावात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. गावात स्वच्छता राहावी म्हणून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरवून स्वच्छतेकडे लक्ष दिले जात आहे. ‘माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गत गावात विविध उपक्रम ग्रामपंचायतीने राबवले आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत दोनवेळा गावात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामरक्षक दल स्थापन करून ज्या ठिकाणी रुग्ण निघाला होता त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांना प्रकाशा ग्रामपंचायतीने दंडाच्या पावत्या देऊन धडाही शिकवलेला आहे. यात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.