भाजी विके्रत्यांना गरज भासू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:29 IST2020-02-19T12:29:17+5:302020-02-19T12:29:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हेमंत ऋतू संपला अन् शिषीर ऋतूला सुरुवात झाल्याने उन्हाची किरकोळ चटकेही जाणवू लागली आहे. ...

Vegetable vendors needed it | भाजी विके्रत्यांना गरज भासू लागली

भाजी विके्रत्यांना गरज भासू लागली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हेमंत ऋतू संपला अन् शिषीर ऋतूला सुरुवात झाल्याने उन्हाची किरकोळ चटकेही जाणवू लागली आहे. त्यामुळे उघड्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सावलीची गरज भासू लागली आहे.
नंदुरबार शहरातील भाजी विक्रेत्यांमध्ये स्थानिकांसह खेड्यांवरुन येणाºया महिला विक्रेत्यांचाही समावेश आहे. शहरातील विक्रेत्यांच्या तुलनेत खेड्यावरुन येणाºया विक्रेत्यांचे प्रमाण अधिक आहे. हे विक्रेते शहराच्या मंगळबाजार, हाट दरवाजा, नेहरु चौक यासह विविध ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसतात. त्यांच्या बसण्याच्या ठिकाणी कुठलीही सावली नसल्यामुळे ते उघड्यावरच बसून गृहिणींना भाज्या उपलब्ध करुन देत आहे. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असल्याने ते नियमित उन, पाऊस तथा थंडी असली तरी त्यांचा दिनक्रम नियमित सुरू आहे. सद्यस्थितीत उन्हाची किरकोळ चटके जाणवू लागले असल्याने या भाजी विक्रेत्यांना सावलीची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून छत्रीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे त्यांना उन असले तरी भाज्यांची विक्री करता येत आहे. ज्यातून त्यांच्या कामाचा मोबदला मिळून व उदरनिर्वाह देखील होत आहे.

Web Title: Vegetable vendors needed it