तळोदा महाविद्यालयात विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:56+5:302021-02-13T04:30:56+5:30

या पंधरवडा दरम्यान 'एका मराठी ग्रंथालयाचे मनोगत' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम संजय भीमसिंग वसावे, व्दितीय ...

Various competitions in Taloda College | तळोदा महाविद्यालयात विविध स्पर्धा

तळोदा महाविद्यालयात विविध स्पर्धा

या पंधरवडा दरम्यान 'एका मराठी ग्रंथालयाचे मनोगत' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम संजय भीमसिंग वसावे, व्दितीय मगन रायसिंग वसावे तर तृतीय दशरथ आरशी पाडवी याने पटकावला. त्याचप्रमाणे मराठी शुध्दलेखन स्पर्धेत प्रथम पुजा अरुण वळवी, व्दितीय सविता कोडवा वसावे तर तृतीय क्रमांक नेहा कालुसिंग पाडवी हिने मिळवला. या वेळी मराठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन ही करण्यात आले होते. त्यात प्रथम शुभांगी रमेश गावीत, व्दितीय हिराबाई चिणक्या पावरा तर तृतीय मनीष राजेंद्र चव्हाण व नीलेश चिणक्या पावरा यांनी संयुक्तपणे प्राप्त केला. विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या स्पर्धांचे संयोजन प्रा.यू.एस. वळवी यांनी केले होते. प्रा.मोहन वसावे यांनी तांत्रिक प्रक्रिया पार पाडली. प्रा.जे.के.पिंपरे आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर. मगरे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुधीरकुमार माळी व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Various competitions in Taloda College