शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे चित्र प्रदर्शनासह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

शहादा येथील शिव छत्रपती स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‌घाटन नगराध्यक्ष मोतीलाल ...

शहादा येथील शिव छत्रपती स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‌घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, उद्योजक श्याम जाधव, शिवाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, हेमलता शितोळे, हिंमतराव बोरसे, डॉ. किशोर पाटील, महिला भाजप शहराध्यक्षा रोहिणी भावसार, संतोष वाल्हे, वनमला पवार आदी उपस्थित होते.

तूप बाजार गणेश मित्र मंडळ

शहरातील श्री तूप बाजार गणेश मित्र मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद नगरलगत असलेल्या साईबाबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उद्योजक श्याम जाधव, नगरसेवक चंद्रकांत पाटील, डॉ. किशोर पाटील, प्रा.डॉ. रवींद्र कदम, विजय कदम, देवाजी बोराणे, राजेंद्र गायकवाड, गिरधर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी प्रतिमा पूजन व अन्नदानाचा कार्यक्रमही झाला.

कहाटूळ येथे प्रतिमा पूजन

शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील के.वाय.आर. पाटील माध्यमिक व आनंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिक्षक कैलास पाटील, कार्यालय प्रतिनिधी ईश्वर पाटील, पी.डी. पाटील आदी उपस्थित होते.