पुरुषोत्तमनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:00+5:302021-03-17T04:31:00+5:30

याप्रसंगी सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तुकाराम गावीत, डॉ.तोशिफ काजी, डॉ.रेखा नाईक, के.एस. खैरनार, ...

Vaccination campaign launched by Purushottamnagar Primary Health Center | पुरुषोत्तमनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण मोहीम सुरू

पुरुषोत्तमनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण मोहीम सुरू

याप्रसंगी सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तुकाराम गावीत, डॉ.तोशिफ काजी, डॉ.रेखा नाईक, के.एस. खैरनार, एन.पी. पटेकर, आय. व्ही. परदेशी, व्ही. डी. पावरा, व्ही.एम. गठरी, योगिता पाटील, रंजना चव्हाण आदी मेडिकल स्टाफचे कर्मचारी उपस्थित होते.

१९७० पासून सातपुडा कारखान्यात सेवा देणारे निवृत्त कर्मचारी शिवाजी मराठे यांना पहिली लस देण्यात आली. त्यानंतर कारखान्याचे संपर्क अधिकारी प्रवीण पाटील, जनरल मॅनेजर अशोक पाटील व इतर १०० नागरिकांना लस देण्यात आली असून, या सेवेबद्दल माहिती देताना डॉ. तुकाराम गावीत म्हणाले की, दर आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. ४५ ते ५९ वर्षाच्या आतील नागरिकांना डायबिटीस किंवा बी.पी.व इतर आजार असल्यास एम.डी. डॉक्टरांचे किंवा सक्षम आरोग्य अधीक्षकांकडून सर्टिफिकेट आणल्यास त्यांना देखील लस देण्यात येईल व लसीकरणानंतर जर काही त्रास झाल्यास घाबरू नका त्यांनी औषधे सोबत दिली आहे. त्याचा उपयोग करावा व ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे लसीकरणानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले नाव नोंदणी करून लस घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Vaccination campaign launched by Purushottamnagar Primary Health Center