गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जयनगर केंद्रांतर्गत लसीकरण जनजागृतीसाठी सर्व शिक्षकांची टास्क फोर्स समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जयनगर केंद्रअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने समिती गठित केली आहे. केंद्रप्रमुख आर.बी. माळी यांच्या उपस्थितीत दररोज केंद्रांतर्गत येणाऱ्या दोन-तीन गावात जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे कार्य शिक्षकांनी हाती घेतले आहे. त्यासाठी केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक हे अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्या मदतीने लसीकरणाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. प्रत्येक गावात स्थानिक बोलीभाषेनुसार प्रबोधन करण्यात येत आहे. ग्रामस्थांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगितले जात आहेत. या उपक्रमास सरपंच, उपसरपंच, पदाधिकारीही उपस्थित राहत असून ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जयनगर केंद्राअंतर्गत लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST
गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जयनगर केंद्रांतर्गत लसीकरण जनजागृतीसाठी सर्व शिक्षकांची टास्क फोर्स ...
जयनगर केंद्राअंतर्गत लसीकरण जनजागृती
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}