शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 12:19 IST

लसीकरणाचा शुभारंभ : जिल्ह्यातील १० हजार ८५७ कोरोना योद्ध्यांना मिळणार मोफत लस, आता मंगळवारी मोहिम जिल्ह्यात कोरोना लसिकरणाला शनिवार, १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. एकाच वेळी चार केंद्रांवर ही मोहिम सुरू करण्यात आली. औपचौरिक शुभारंभ जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर करण्यात आला. यावेळी पालकमंत्री के.सी.पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणानंतर कुणालाही कसलाही त्रास झाला नाही. असे असले तरी दिवसभर संबधीत केंद्रांवर आवश्यक त्या उपायोजना आणि रुग्णवाहिका तैणात करण्यात आल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी नीलिमा वळवी यांनी पहिली लस घेतली.यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी बोलता पालकमंत्री पाडवी म्हणाले, देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे.लसीकरणाच्या साहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  असे आहेत डोस...जिल्हा रुग्णालयासह    अक्कलकुवा आणि म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही    लसीकरणास सुरुवात झाली. या चारही केंद्रांवर  १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे ७५ कुप्या (७५० डोस), म्हसावद १७० (१७०० डोस), नवापूर ८५ (८५० डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या १२० कुप्या (१,२०० डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत.

 लसीकरणानंतर रिॲक्शन नाही...

लसीकरणानंतर जिल्ह्यात कुणालाही रिॲक्शन आली नाही. दिवसभरात २६५ जणांना लस देण्यात आली. सुरुवातीला अनेकांचा मनात भिती होती. त्यामुळे स्वत: अधिकारी यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन लस टोचून घेतली.  रिॲक्शन आल्यास जिल्हा रुग्णालयात त्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्थानिक स्तरावर प्रथोमचार करून लागलीच रुग्णवाहिकेद्वारा जिल्हा रुग्णालयात त्यांना आणण्याची सुविधा आहे. 

पहिल्या लसीचा मान मिळाल्याने आनंद आहे. लोकांनी लस बाबत भिती बाळगू नये. नोंदणी केलेल्या प्रत्येकाने ती घ्यावी. मोठ्या मेहनतीने शास्त्रज्ञांनी ती घेतली आहे. -आर.डी.भोये, जिल्हा शल्य चिकित्सक.