शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जयनगरसह परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही ...

शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने तेव्हाही गहू, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी फवारणी करूनही पिके पूर्वपदावर आणली होती. मात्र आता परत ढगाळ वातावरणासोबत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन चालू असून, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची केळीबाग तयार झाली आहे त्या शेतकऱ्यांचा बराचसा माल व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिल्यामुळे परिपक्व झालेले घड रात्रभरच्या पावसामुळे गळून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गहू पेरणी केली आहे त्या गव्हाला फुटकी पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. जयनगरसह अनेक शेतकरी सध्या कांदा लागवड करीत असून, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोठली गावात तीन-चार शेतकऱ्यांनी कांदा काढणी केली असून अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.