शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांतील २८ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:17 IST

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : आॅनलाईन कनेक्टीव्हीटीच्या समस्येवर मात करीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने ‘अनलॉक ...

हंसराज महाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : आॅनलाईन कनेक्टीव्हीटीच्या समस्येवर मात करीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने ‘अनलॉक लर्निंग’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येणार आहे व त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे.कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे आॅनलाईन स्टडीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी ‘स्टडी फ्रॉम होम’ ही संकल्पना स्वीकारली. मात्र कनेक्टीव्हीटीच्या समस्येमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन स्टडी फ्रॉम होम ही संकल्पना वास्तवात उतरू शकत नव्हती. त्यातच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून लॉकडाऊनमुळे अद्याप शाळा सुरू होऊ शकलेल्या नसून लॉकडाऊन कालावधी कधी संपेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत आता ‘अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.या उपक्रमाचा पहिला टप्पा १ जुलै ते १५ आॅगस्ट २०२० असा ४५ दिवसांचा राहणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील शिकलेल्या मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास व विज्ञान या विषयांच्या मूलभूत क्षमतांवर आधारित कार्यपुस्तिका व सहशालेय उपक्रमांसाठी कृतीपुस्तिका विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आदिवासी विकास विभागातील कार्यरत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी या कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका तयार केल्या आहेत. प्रकल्प कार्यालयामार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात दहा टक्के जास्त या कार्यपुस्तिका व कृतिपत्रिकांची प्रकल्पस्तरावरच छपाई करण्यात येणार आहे.दुसरी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका देण्यात येणार आहे. ३० जून २०२० पर्यंत त्यांची छपाई करून विद्यार्थ्यांच्या घरी पोहोच करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाचे नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांनी नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर येथील अपर आयुक्त व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत.या आदेशानुसार तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यलयाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाºया आश्रमशाळांमध्ये ‘अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे सूक्ष्म नियोजन तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून केले जात असून प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाºया तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन तालुक्यातील ४२ शासकीय व २१ अनुदानीत आश्रमशाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. गावनिहाय शिक्षकांचा गट करून विद्यार्थी विभागून देण्यात येणार असून तो गट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका वितरीत करणार आहे. शासकीय आश्रशाळांमध्ये शिकणाºया सुमारे १७ हजार तर अनुदानित आश्रमशाळेत शिकणाºया ११ हजार विद्यार्थ्यांना ‘अनलॉक लर्निंग’ या उपक्रमाचा लाभ होणार आहे.लर्निंग किट होणार वाटपअनलॉक लर्निंग या उपक्रमात आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थी शिकत असणाºया वर्गाची क्रमिक पाठ्यपुस्तके व कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका घरपोच पुरविण्यात येणार आहे. याशिवाय ‘अनलॉक लर्निंग’ या उपक्रमात आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक ‘लर्निंग किट’देखील दिली जाणार आहे. या लर्निंग किटमध्ये कार्यपुस्तिका, कृतिपुस्तिका, पाठ्यपुस्तके यांच्यासह पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर आणि स्कूल बॅग यांचा समावेश आहे.

अनलॉक लर्निंग या उपक्रमात विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा यासाठी त्यांना घरपोच लर्निंग किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लर्निंग किट घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी व पालक यांना शाळेत बोलावण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या गृहभेटीचे नियोजन करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांना घरपोच लर्निंग किटचे वितरण करावे, असे बजावण्यात आले आहे.