ढंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:17 PM2020-02-19T12:17:33+5:302020-02-19T12:17:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनसजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ढंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी ...

Two-wheeler injured in collision | ढंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

ढंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनसजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ढंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली होती़ याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़
दिलीप राघो पाटील रा़ शिवाजी नगर, होळ तर्फे हवेली शिवार असे जखमीचे नाव आहे़ दिलीप पाटील हे ६ फेब्रुवारी रोजी तळोदा येथून घराकडे येत असताना ट्रक टर्मिनस समोर मागून येणाºया एमएच १८ बीए ६१७६ या वाळू वाहून नेणाºया ढंपरने त्यांना धडक दिली़ धडकेत पाटील हे मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली़ परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते़
याप्रकरणी सुभाष पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकरे करत आहेत़
जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे़ गेल्या दोन महिन्यात बायपास रोड व धुळे रोडवर किमान तीन ते चार जिवघेणे अपघात घडले आहेत़ यानंतरही शहरातून वाळू वाहून नेणारे ढंपर बिनबोभाटपणे फिरत आहेत़ शहरात सकाळी अवजड वाहनांना एंट्री नसताना अनेक ढंपर वाळू घेऊन जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे़

Web Title: Two-wheeler injured in collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.