किराणा घेऊन जाणारा ट्रक अडवून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:59 IST2021-02-28T04:59:29+5:302021-02-28T04:59:29+5:30

नंदुरबार : किराणा सामान घेऊन जाणारे वाहन अडवून शिवीगाळ केल्याच्या वादातून पाच जणांनी दोघांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी ...

The two were stopped by a truck carrying groceries and beaten | किराणा घेऊन जाणारा ट्रक अडवून दोघांना मारहाण

किराणा घेऊन जाणारा ट्रक अडवून दोघांना मारहाण

नंदुरबार : किराणा सामान घेऊन जाणारे वाहन अडवून शिवीगाळ केल्याच्या वादातून पाच जणांनी दोघांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अक्कलकुवा येथे घडली. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामील हुसेन अहमद हुसेन मक्राणी हे त्यांच्या किराणा दुकानासाठी माल घेऊन जात होते. त्यावेळी परवेज उर्फ गुड्डू नासीर हुसेन मक्राणी यांनी वाहन अडवून शिवीगाळ केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. परवेज याने लाकडी दांडका घेऊन जमिल यास मारहाण केली. त्यासोबत नासीर हुसेन गुलाम हुसेन मक्राणी, हमशेरबी नासीर हुसेन मक्राणी, लियाकतअली मेहबूब अली, अकिब अली आसीफ अली सर्व रा.दर्गारोड, अक्कलकुवा यांनी देखील हाताबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारले. साजेदाबी अबीद हुसेन मक्राणी यांना देखील मारहाण करण्यात आली. याबाबत जमिल मक्राणी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उत्तम पवार करीत आहे.

Web Title: The two were stopped by a truck carrying groceries and beaten