तळोदा तालुक्यातील दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST2021-04-27T04:31:35+5:302021-04-27T04:31:35+5:30

तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला असून वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल होताना दिसत आहे. असे असले तरी ...

Two thousand patients from Taloda taluka overcome corona | तळोदा तालुक्यातील दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात

तळोदा तालुक्यातील दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात

तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला असून वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल होताना दिसत आहे. असे असले तरी पूर्ण ताकदीने प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र जनतेनेदेखील प्रशासनाला प्रतिसाद देेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप शहरातील नागरिक अनुभवत आहेत. या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण धडकी भरवणारे आहे. त्याच वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही चिंता वाढविणारे आहे. शहरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागाचे काही गावेच्या गावे संक्रमित केली आहेत. काही गावांचे मुखीयाच या कोरोनाने गिळले आहेत. मात्र अशा कठीण काळातही अनेक जण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा हिमतीने सामना करीत आहेत. आजवर तळोदा तालुक्यात ३ हजार १७६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील २ हजार १३३ जणांनी कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे.

तळोदा तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी

कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

तळोदा तालुक्यात आतापावेतो १५ हजार ४९७ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ३ हजार १७६ नागरिक कोविड संक्रमित झाले आहेत आहेत. त्यापैकी ९८३ जण तालुक्यात सलसाडी, तळोदा उपजिल्हा रुग्णालय व इतर विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. तळोदा तालुक्यातील ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २ हजार १३३ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

Web Title: Two thousand patients from Taloda taluka overcome corona