चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:28 IST2020-02-14T12:27:45+5:302020-02-14T12:28:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीच्या उद्देशाने मध्यरात्री दुकान संकुलाच्या परिसरात फिरणाºया दोघांना १२ रोजी नंदुरबार व तळोदा येथून ...

Two men arrested for attempted burglary | चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चोरीच्या उद्देशाने मध्यरात्री दुकान संकुलाच्या परिसरात फिरणाºया दोघांना १२ रोजी नंदुरबार व तळोदा येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले असून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाजीम उर्फ मक्कू अजीज कुरेशी, रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार व सागर रमेश वळवी, रा.धडगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. नंदुरबार बसस्थानक व्यापारी संकुलात मध्यरात्रीनंतर पोलीस गस्त घालत असतांना नाजीम उर्फ मक्कू कुरेशी हा दुकानाच्या आडोशाला लपलेला आढळून आला. त्याची झडती घेतली असता चाव्यांचा गुच्छा व स्क्रू ड्रायव्हर आढळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना तळोदा येथे घडली. मुख्य रस्त्यावरील मोबाईल दुकानाच्या आडोशाला सागर रमेश वळवी हा संशयास्पदरित्या लपलेला आढळून आला. त्याला पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडूनही घरफोडीचा सामान जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध नंदुरबार व तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Two men arrested for attempted burglary