लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटात मारहाण

By Admin | Updated: April 29, 2017 15:34 IST2017-04-29T15:34:27+5:302017-04-29T15:34:27+5:30

तब्बल महिनाभरानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Two groups assaulted by children's play dispute | लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटात मारहाण

लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटात मारहाण

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 29 -  किरकोळ कारणावरून मामाचे मोहिदा येथे दोन गटात  हाणामारी झाली. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा जणांना अटक करण्यात आली.
मोहिदा येथील कैलास उखा महिरे व ईश्वर देवचंद महिरे यांच्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून मारहाण झाली होती. दोन्ही कडील जमावाने एकमेकांवर चाल करून हाणामारी केली. याबाबत कैलास उखा महिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर देवचंद महिरे, भगवान पुंडलीक ईशी, राहुल सुभाष महिरे, सिद्धार्थ काशिनाथ महिरे, संतोष अशोक पिंपळे, भगवान काशिनाथ महिरे, विश्वनाथ काशिनाथ महिरे, मिलिंद  भगवान महिरे, विजय सखाराम साळवे, दशरथ विजय साळवे, सुनील अण्णा महिरे, देवकाबाई संतोष पिंपळे, अनिताबाई भगवान ईशी, मनिषा ईश्वर महिरे, सध्यांबाई भगवान महिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी फिर्याद संतोष अशोक पिंपळे यांनी दिली. त्यावरून अजरून सिद्धार्थ पानपाटील, कैलास उखा महिरे, नथा पिरा महिरे, गणेश राजेंद्र पेढारकर, भगवान नाना रामराजे, मायाबाई कैलास महिरे, सागर कैलास महिरे, संगर} कैलास महिरे, शारदा कैलास महिरे, अशोक सुदाम महिरे, राहुल सावर कुवर, विशाल अशोक महिरे, रामचंद्र फकिरा महिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   

Web Title: Two groups assaulted by children's play dispute