करडे शिवारात वीजतारा पडून दोन बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:46 IST2020-09-02T13:46:02+5:302020-09-02T13:46:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील करडे येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास विजेचे पोल कोसळून वीजवाहक तारा अंगावर पडून ...

Two bulls were killed when a lightning struck a gray field | करडे शिवारात वीजतारा पडून दोन बैल ठार

करडे शिवारात वीजतारा पडून दोन बैल ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील करडे येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास विजेचे पोल कोसळून वीजवाहक तारा अंगावर पडून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
करडे येथील हिंमत सुरसिंग भिलाव हे सिंगसपूर शिवारात सर्व्हे नं. २०६ मध्ये आपले बैल चारत असताना जोरदार पावसामुळे विद्युत खांब तारेसह खाली पडला. परंतु त्या तारेत विद्युत प्रवाह सुरू असल्याने बैल त्या तारेवर खेचला गेला व त्यात बैलांचा मृत्यू झाला. याबाबत बैल मालक हिंमत भिलाव यांनी पोलीस पाटील राजेंद्र वसावे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटीलांनी सरपंच रतन डुमकुळ, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वासराव नवले, वायरमन परशुराम पवार यांना घटनेची माहिती सांगितली.
या वेळी घटनास्थळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.नवले, डॉ.महेंद्र जमदाळे, डॉ.बहिरम पाटील यांनी भेट देवून मयत बैलांचा पंचनामा केला. या बैलाची किंमत ४० ते ५० हजार रूपये असल्याचे सांगितले. घटनास्थळी माजी जि.प. सदस्य दिवाकर पवार, पोलीस पाटील राजेंद्र वसावे, वीज वितरण कंपनीचे परशुराम पवार, सरपंच रतन डुमकुल आदी उपस्थित होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला तत्काळ भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Two bulls were killed when a lightning struck a gray field