शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटिशीला अडीच हजार करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : केंद्र शासनाने पीएम किसान योजनेसोबतच पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५०० शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. ...

नंदुरबार : केंद्र शासनाने पीएम किसान योजनेसोबतच पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५०० शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. दरम्यान त्यांना वार्षिक पेन्शन मिळाली होती. ही पेन्शन परत करण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर आजवर केवळ १ हजार ८०० शेतकऱ्यांनी रक्कम परत केल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवत पीएम किसान सन्मान निधीतून पेन्शन योजनेचे प्रीमियम भरून देण्याचे तयारी ठेवत केंद्र शासनाने पीएम पेन्शन योजना सुरू केली होती. सन्मान निधीतील या योजनेत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकरी समाविष्ट झाले होते. परंतु यातील ४ हजार ५०० शेतकरी हे करदाते आणि अपात्र असल्याने त्यांना रक्कम परत करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर १ हजार ३६७ करदात्या शेतकऱ्यांनी एक कोटी ३३ लाख तर अपात्र शेतकऱ्यांनी ४० लाख २४ हजार रुपये परत केले आहेत. २ हजार ६१७ शेतकऱ्यांकडे अद्याप निधी मागणी सुरू आहे.

एक कोटी ७४ लाख वसूल

योजनेतील अपात्र ५१६ शेतकरकऱ्यांकडून महसूल विभागाने ४० लाख २४ हजार तर १ हजार ३६७ करदाते शेतकऱ्यांकडून १ कोटी ३३ लाख ७३ हजार रुपये वसूल केले आहेत. उर्वरित २ हजार ६१७ शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत.

रक्कम परत न करणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने तहसीदारांमार्फत नोटिसा देण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान रक्कम परत न केल्यास त्या-त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून त्यांच्याकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याचप्रकारे वसुली करण्याचे काम करण्यात आले होते.

योजनेतून १ लाख २९ हजार शेतकरी थेट लाभ घेत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना साधारण सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळत आहेत. दरम्यान गेल्या वर्षात साधारण ४० हजार शेतकऱ्यांना बँक खात्यांबाबत अडचणी आल्याचे सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी खाते क्रमांक आणि इतर माहिती व्यवस्थित दिल्यानंतर हा मुद्दा निकाली काढण्यात आला आहे. हे शेतकरी समाधानी आहेत. जिल्ह्यात साधारण पाच हजारच्या जवळपास शेतकऱ्यांना अद्यापही रकमेची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या बँक खात्यांचे अपडेशन सुरू असल्याने ही कारवाई लांबली असल्याचे समजते.

नंदुरबार तालुक्यात अपात्र आणि करदाते शेतकऱ्यांकडून वेळेवर वसुली करण्यात आली होती. वसुलीसाठी एकही शेतकरी शिल्लक नाही. ही योजना आता कृषी विभागाकडे गेली आहे. एका कुटुंबातील व्यक्तीनी योजनेसाठी अर्ज केल्याने ते अपात्र ठरले होते.

-भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, नंदुरबार