शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगासोबतच क्षयरोगाचा विळखा होतोय घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:52 IST

राधेश्याम कुलथे लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग मोहिमेत शहादा तालुक्यातील एकूण ...

राधेश्याम कुलथेलोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग मोहिमेत शहादा तालुक्यातील एकूण ८० हजार ८३१ कुटुंबांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या तपासणीत तालुक्यातील ३८ जणांना कुष्ठरोग, तर २३ जणांना क्षयरोग आजाराने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांच्या सनियंत्रणात कुष्ठरोगाचे एन.ए.एम.आर.एफ. ठाकरे, पी. एम. डब्ल्यू. सरवर बेलदार, क्षयरोगाचे एस.टी.एस. संजय निकुम, मेघा     खारकर यांच्या नियंत्रणात १ ते १६ डिसेंबर या कालावधीत शहर व ग्रामीण भागात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली.   वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत या मोहिमेंतर्गत शहादा तालुक्यातील ८० हजार ८३१ कुटुंबातून तीन लाख ८३ हजार ८६ नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. या तपासणी       मोहिमेत अंगावरील चट्टे, हातपायाला मुंग्या येणे,     स्नायूमध्ये अशक्तपणा, भुवयांवरील केस विरळ होणे, चेहरा तेलकट         होणे, तळहात व तळपायाला बधीरता येणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे     असलेले संशयित रुग्ण ५७१ आढळून आले आहेत, तर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्त जाणे, मानेवर गाठ येणे अशी लक्षणे असणारे ४७५ संशयित क्षयरोग रुग्ण आढळून आले. या संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ३८ जणांना कुष्ठरोग व २३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली .या भागात आढळले रुग्णशहादा तालुक्यात एकूण २९१ टीम कार्यरत होत्या. त्यात ५८६ कर्मचारी, ५८ सुपरवायझर यांची क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी १ ते १६ डिसेंबर या कालावधीत तीन लाख ८३ हजार ८६ रुग्णांची तपासणी केली. यामध्ये शहादा शहरात कुष्ठरोग तीन व क्षयरोगाचे दोन रुग्ण आढळून आले. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे चार, तर क्षयरोगाचे पाच रुग्ण, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे तीन व क्षयरोगाचा एक रुग्ण, कहाटूळ, मंदाणे, शहाणा व कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग व क्षयरोगाचा प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला. वाघर्डे आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे चार रुग्ण आढळले. आडगाव आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचा एक तर क्षयरोगाचे चार रुग्ण, सुलवाडे केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे तीन व क्षयरोगाचा एक रुग्ण, कलसाडी केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे पाच व  क्षयरोगाचे तीन रुग्णं, पाडळदा केंद्रांतर्गत कुष्ठरोग असलेले सात व क्षयरोगाचे दोन रुग्ण, प्रकाशा केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे दोन व क्षयरोगाचा एक, तर  पुरुषोत्तमनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे दोन रुग्णं आढळून आले आहेत.

मोफत उपचार मिळणारआरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग मोहिमेत तपासणी केलेल्या नागरिकांमधून कुष्ठरोगाच्या ३८  व क्षयरोगाच्या २३ रुग्णांवर उपचार करून त्यांना मोफत औषधी दिली जाणार आहे. तसेच क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान दरमहा ५०० रुपये तसेच ७५० रुपये असे एकूण सहा महिन्यांचे  तीन हजार ७५० रुपये मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

तपासणी मोहिमेत कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले असून, रुग्णांवर मोफत औषध उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांना योग्य ती काळजी घेऊन सहा ते नऊ महिने औषधोपचार सुरू राहणार आहे.-डॉ.राजेंद्र वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शहादा