ट्रकने दोघा पादचाऱ्यांना उडवत दिली कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:35 PM2020-06-05T12:35:39+5:302020-06-05T12:35:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव ट्रकने दोन पादचाऱ्यांना उडवून कारलाही धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना प्रकाशा ...

The truck blew up two pedestrians and hit the car | ट्रकने दोघा पादचाऱ्यांना उडवत दिली कारला धडक

ट्रकने दोघा पादचाऱ्यांना उडवत दिली कारला धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव ट्रकने दोन पादचाऱ्यांना उडवून कारलाही धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना प्रकाशा येथे घडली. याबाबत ट्रक चालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी अर्थात मार्च महिन्यात देखील याच ठिकाणी भाविकांच्या वाहनाला अपघात झाला होता.
राजेंद्र बाबुराव पाटील, संगिताबाई तुळशीराम पाटील, शोभाबाई तुळशीराम पाटील सर्व रा. सुरत हे जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, शहादाकडून प्रकाशाकडे येत असलेल्या भरधाव ट्रकने (क्रमांक एमएच १८- एए ८६४७) रस्त्याने जाणाºया दोन जणांना कट मारला. त्यात ते खाली पडून जखमी झाले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरून आलेल्या कारलाही (क्रमांक जीज १५०९) धडक दिली. त्यात कारमधील तिघांना मुका मार लागला शिवाय कारचेही नुकसान झाले.
रस्त्याने जाणाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर ट्रक चालकाने थांबवली. याबाबत कारचालक समाधान सुपडू पाटील, रा.सुरत यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.
दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. मार्च महिन्यात देखील भाविकांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यानंतरही तुरळक अपघात होतच असतात.

Web Title: The truck blew up two pedestrians and hit the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.