शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

आदिवासी, ओबीसींचे उत्थान केवळ भाजपनेच केले- अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेसने आदिवासी, ओबीसी, दलितांचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र, भाजप सरकारने ख:या अर्थाने या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेसने आदिवासी, ओबीसी, दलितांचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र, भाजप सरकारने ख:या अर्थाने या समाजाच्या उत्थानासाठी काम केल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवापूर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.भाजप उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची नवापुरात सभा झाली. यावेळी बोलतांना शहा यांनी आदिवासी समस्यांवर थेट घाव घालत आदिवासींच्या हितासाठी केवळ भाजपने काम केले. स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असतांना स्वतंत्र आदिवासी विभाग सुरू करण्यात आला. राज्यात देखील भाजप सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी विभाग स्वतंत्र केला. काकासाहेब कालेलकर यांनी दिलेल्या ओबीसी अहवालाकडे काँग्रेस सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले होते. 370 कलम रद्द करण्याची हिंमत केवळ भाजप सरकारने दाखविली. काँग्रेस त्यावरही राजकारण करणीत आहे, टिका करीत आहे. आदिवासींच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास हे सरकार बांधील आहे. आदर्श आदिवासी जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प आहे. उमेदवार भरत गावीत हे निवडून आल्यावर त्यासाठी काम करणार आहे. नवापूरच्या सभेचे नियोजन नव्हते. परंतु मी खास करून सभा लावून घेत येथे आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर उमेदवार भरत गावीत यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.