शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक कठड्यांअभावी वाहतूक धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडा व विंध्य पर्वतातील गावे तथा तीन राज्यांना सोयीस्कर ठरणाऱ्या डेडीयापाडा ते शिरपूर या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडा व विंध्य पर्वतातील गावे तथा तीन राज्यांना सोयीस्कर ठरणाऱ्या डेडीयापाडा ते शिरपूर या महामार्गावरील सर्वात मोठ्या पुलावर कधीच कठडे बसवले गेले नाही. कठड्यांअभावी १९६० च्या दशकात बनलेला कुंडल ता.धडगाव येथील पुल तिन्ही राज्यातील प्रवाशांना धोक्याचा ठरत आहे.इंग्रजांच्या राजवटीत गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांचा संपर्क तुटू नये, म्हणून विंध्य व सातपुडा या दोन पर्वत रांगेत ब्रिटीशांनी रस्ते बनवले होते. त्या रस्त्यांपैकी दरा ता. शहादा ते मोलगी हा एक रस्ता आहे. या रस्त्यावरून भूदान चळवळीचे प्रणेते विनोबे भावे यांनी देखील पायी प्रवास केल्याची नोंद इतिहासात आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा रस्ता नव्याने तयार झाला. या रस्त्यावर १९६० दशकात काही पुलांची कामेही करण्यात आली. डाब ता. अक्कलकुवा येथे उगम पावणाºया तथा नर्मदेच्या उपनद्या उदय व देवानंद या दोन्ही नद्या या रस्त्यावर आल्या आहे. या धडगाव- मोलगी भागातल्या सर्वात मोठ्या नद्या असल्याने दोन्ही ठिकाणी पुलाची नितांत गरज भासली. रस्त्याच्या नवीन कामात या नद्यांवर पुल बनले. त्यामुळे तिन्ही राज्यातील प्रवाशांच्या सोयीत भर पडली, यात शंका नाहीच.उदय नदीवरील पुलाला सुरुवातीपासूनच कठडे आहे, त्या पुलाच्या बांधकामाची रचनाच कठडेयुक्त आहे. तशी रचना कुंडल येथील देवानंद नदीवरील पुलाची ठेवली गेली नाही. लोखंडी कठड्यांची रचना ठेवण्यात आली. लोखंडी कठड्याची रचना ही दिर्घकाळ टिकत नसून पुलाची लवकरच दुरावस्था होते. परंतु लोखंडी कठड्यांसाठीही देवानंद नदीवर बांधकाम विभागाकडून ६० वर्षाच्या कालावधीत कधीच करण्यात आली नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी सुविधा असूनही हा पूल तीन राज्यातील प्रवाशांना वषार्नुवर्षे धोक्याचा ठरत आला आहे. प्रवाशांच सुरक्षेसाठी तातडीने या पुलावर कठडे तयार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.४पुलाचे कठडे तयार करण्यासाठी आजपर्यंत बांधकाम विभागामार्फत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. २००७ मध्ये देवानंद नदीला महापूर आला होता, त्या पुरात पुलाच्या एका बाजूचा भराव पूर्णत: वाहून गेला होता. रस्ता तुटून वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती, त्यावर मात करीत वाहतुक सुविधा पुर्ववत करण्यासाठी तो भराव भरण्यात आला. परतु कठड्यांबाबत कुठलाही विचार करण्यात आला नाही.४या पुलाची क्षती होत असल्याचे निदर्शनाच येताच तिन्ही राज्यातील प्रवाशांचे संभाव्य संकट टाळण्यासाठी तातडीने डागडुजीही करण्यात आली. परंतु कठडे बांधण्यासाठी मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे कठड्यांबाबत बांधकाम यंत्रणाच उदासिन असल्याचे स्पष्ट होत आहे.४डेडीयापाडा (गुजरात) ते शिरपूरपर्यंत हा मार्ग आंतरराज्य मार्ग म्हणून घोषीत करण्यात आला. तसा हा पूल तिन्ही राज्यातील बहुसंख्य गावांना जोडणारा आहे. परंतु संबधित यंत्रणेलाच याचे महत्व का कळाले नाही, अशी शोकांतिका तिन्ही राज्यातून व्यक्त करण्यात येत आहे.