शालेय आरोग्य विषयावर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:53+5:302021-02-26T04:44:53+5:30

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे शालेय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत ...

Training on school health issues | शालेय आरोग्य विषयावर प्रशिक्षण

शालेय आरोग्य विषयावर प्रशिक्षण

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे शालेय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील औरंगाबाद, बीड, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या नऊ जिल्ह्यातील सहावी ते बारावीपर्यंतच्या नऊ हजार ६०० शाळांचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत. २२ ते २५ फेब्रुवारी असे चार दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात एकूण ११ सत्र घेण्यात आले. या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक डाॅ. अभय परीवर, डाॅ. अमृत चव्हाण व बाळासाहेब कछवे (नांदेड), डॉ.प्रमोद कुमावद व योगेश्वर जाधव (औरंगाबाद), डाॅ. मंजुषा क्षीरसागर (जळगाव), डाॅ. अमोल डोंबळे (वाशिम), डाॅ.राजेश गोरे व सचिन चव्हाण (बीड), डाॅ.वनमाला पवार (नंदुरबार), दीपक चांदुरे व डाॅ.आर.व्ही. बनसोड (अमरावती), डाॅ.गिरीश बोरसे (धुळे) आणि योगेश सोनवणे (नाशिक) या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवसाच्या सातव्या सत्रात नंदुरबार डायटच्या प्रा.डाॅ.वनमाला पवार यांनी ‘अमली पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतात सुमारे ३४ लाख लोक अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनामुळे कुटुंब उद्‌ध्वस्त होते त्यासाठी समाज विकसित झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असेही वनमाला पवार यांनी सांगितले.

Web Title: Training on school health issues