शहादा येथे पेसा कायद्याबाबत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:55+5:302021-06-21T04:20:55+5:30

शहादा तालुक्यात संस्थेतर्फे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. संस्थाध्यक्ष डॉ. कांतिलाल टाटीया यांनी स्वतः तीन टप्प्यात प्रशिक्षण ...

Training on PESA law at Shahada | शहादा येथे पेसा कायद्याबाबत प्रशिक्षण

शहादा येथे पेसा कायद्याबाबत प्रशिक्षण

शहादा तालुक्यात संस्थेतर्फे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. संस्थाध्यक्ष डॉ. कांतिलाल टाटीया यांनी स्वतः तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले. शहादा तालुक्यातील ज्या तरुणांनी प्रशिक्षण घेतले होते, त्यांना प्रमाणपत्र व ‘पेसाचा वसा’ ही पुस्तिका वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. डॉ. टाटीया यांनी पेसा कायद्याचे वैशिष्ट्य सांगत या कायद्यामुळे ग्रामसभेला मिळालेल्या अधिकारांसंदर्भात उहापोह केला. तरुणांनी रोजच्या व्यवहाराशी निगडीत कायद्यांचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. तरुणांनी सकारात्मक विचार करून कायद्याचा समाजासाठी कसा उपयोग करता येतो, बाबत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी माहिती दिली. उपस्थित प्रशिक्षित युवकांना तहसीलदारांच्या हस्ते ‘पेसाचा वसा’ या पुस्तिकेचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विनोद सोनार, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, विलास मराठे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. रामदास पावरा यांनी प्रास्ताविक केले. सचिन पावरा यांनी आभार मानले.

Web Title: Training on PESA law at Shahada