प्रकाशा गावात वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:59+5:302021-04-24T04:30:59+5:30

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बाजारपेठेत आसपासच्या गावातील ग्रामस्थ बाजारहाटसाठी येतात. सध्या ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहात असल्याने ...

Traffic jam in Prakasha village | प्रकाशा गावात वाहतूक ठप्प

प्रकाशा गावात वाहतूक ठप्प

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बाजारपेठेत आसपासच्या गावातील ग्रामस्थ बाजारहाटसाठी येतात. सध्या ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहात असल्याने प्रचंड गर्दी होते. व्यवसायासाठी ११ वाजेपर्यंत परवानगी असताना काही बाहेरील दुकानदार त्यानंतरही दुकाने सुरू ठेवतात. त्यातच दुकानासमोर मोठी वाहने आडवी करून माल उतरवतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. बसथांब्यापासून मेनरोड ते श्रीराम चौकापर्यंत वाहतूक ठप्प होते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर काढण्यासाठी तर इतर वाहनधारकांना वाहने काढण्यासाठी अडचणी येत असल्याने त्यातून वादही होतात. त्यामुळे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावर व कडेला भाजीपाला व इतर वस्तू विक्रेत्यांना मोकळ्या जागेत व्यवसाय करण्याबाबत सूचना देण्याची गरज आहे.

वाहनांना दिशाभूल करणारे फलक

शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मेनरोडवरील एका किराणा दुकानासमोर एक शहादा येथील खासगी मालवाहू वाहन आले होते. या वाहनाच्या पुढे ‘ऑनलाईन मेडिकल ड्युटी’चा बोर्ड लावलेला होता. मात्र, या वाहनात चक्क बाजरीची पोती भरली होती. या वाहन चालकाने दिशाभूल करणारा फलक लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. त्या चालकाला काही जणांनी विचारले असता त्याने चूक मान्य करीत लागलीच ऑनड्युटीचा बोर्ड काढला. असे चुकीचे बोर्ड लावून गावात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, गावातील दुकानदारांना ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही दुकानदार नियम पाळताना दिसत नाहीत. अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Traffic jam in Prakasha village