शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू ठेवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:09+5:302021-03-31T04:31:09+5:30

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत रबी हंगामातील गहू, ज्वारी, मका, हरभरा, ओली मिरची व भाजीपाला ...

Trading of agricultural commodities should continue | शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू ठेवावेत

शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू ठेवावेत

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत रबी हंगामातील गहू, ज्वारी, मका, हरभरा, ओली मिरची व भाजीपाला (नाशवंत) आदी शेतमाल हंगाम सुरू असल्याने शेतकरी हा शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणण्याबाबत वारंवार विचारणा करीत आहेत. आपल्याकडील २७ मार्चच्या आदेशान्वये १ ते १५ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन घोषित केल्याने दरम्यानच्या कालावधीत बाजार समितीमध्ये खरेदी करून पडून असलेल्या वरील शेतमालाचे तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील कापणीस आलेल्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. लॉकडाऊन कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारमधील जीवनाश्यक वस्तूंचा (मिरची, भाजीपाला, अन्नधान्य) दैनंदिन खरेदी- विक्री व्यवहार, लिलाव, मोजमाप करणे, मालाची वाहतूक करणे, मिरची प्रक्रिया उद्योगांमधील दैनंदिन कामकाज सुरू ठेवण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य आदेश व्हावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर बाजार समितीचे सभापती हिरालाल पाटील, सचिव योगेश अमृतकर, नवीन बिर्ला यांच्या सह्या आहेत.

Web Title: Trading of agricultural commodities should continue