शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सलग 50 दिवसांच्या संचारबंदीने व्यापारी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी झाला आहे. राज्यात जिल्ह्याचा कोरोना पॅाझिटिव्हिटी रेट सर्वात कमी झाला आहे. लोकांमध्ये जागरूकतादेखील ...

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी झाला आहे. राज्यात जिल्ह्याचा कोरोना पॅाझिटिव्हिटी रेट सर्वात कमी झाला आहे. लोकांमध्ये जागरूकतादेखील आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात आधीच राज्याने लागू केलेल्या संचारबंदीच्या आधी अर्थात १ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. वाढती रुग्णसंख्या आणि लोकांमधील बेफिकीरपणा यामुळे साथ नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी १ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची लागलीच अंमलबजावणी सुरू झाली. शिवाय शनिवार व रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन कडकडीत पाळण्यात येऊ लागला. त्यानंतर १५ एप्रिलपासून राज्य शासनाने संपूर्ण संचारबंदी लागू केली. आता राज्य शासनाच्या संचारबंदीला ३५ दिवस तर जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीला ५० दिवस झाले आहेत. सलग ५० दिवसांच्या संचारबंदीमुळे मात्र जनता कंटाळली असून व्यापारी, मजूर, छोटे व्यावसायिक यांनी संचारबंदी शिथिल करण्याची मागणी सुरू केली आहे.

छोटे व्यापारी हवालदिल

छोटे व्यावसायिक व व्यापारी सलग ५० दिवसांच्या संचारबंदीमुळे हवालदिल झाले आहेत. त्यांचा रोजगार पूर्णत: बुडाला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत व्यावसायाची परवानगी होती; परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. नंतर अर्थात तीन दिवसांपासून दुपारी एक वाजेपर्यंतची वेळमर्यादा वाढविली आहे. त्यातही केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचाच समावेश आहे.

सरसकट सर्वांना परवानगी हवी

दुपारी एक वाजेची वेळमर्यादा असली तरी त्यात सरसकट सर्वच वस्तू विक्रीच्या दुकानांना परवानगी हवी, अशी मागणी होत आहे. सराफा व्यावसायिक, कापड दुकानदार, भांडी विक्रेते, इलेट्रॅानिक वस्तूंची दुकाने, मोबाइल दुरुस्ती, स्टेशनरी यासह इतर वस्तू विक्रीच्या दुकानांना परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे. शासनाच्या संचारबंदीचे सर्व नियम पाळूनच व्यवसाय करण्याची हमीदेखील या व्यावसायिकांकडून देण्याची तयारी आहे.

अनेकांच्या रोजगारावर गदा

एवढ्या मोठ्या संख्येने दुकाने बंद राहत असल्यामुळे त्यात काम करणाऱ्या मजुरांना देखील फटका बसला आहे. अनेकांना बेरोजगार व्हावे लागल्याने त्यांना भाजीपाला किंवा फळ विक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे.