शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मशालयात्रा असलोद येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क असलोद : माहुरगडावरुन आलेल्या मशाल यात्रेकरुंनी असलोद, ता.शहादा येथे ज्योत आणली. या ज्योतीच्या माध्यमातून तेथील सप्तशृंगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : माहुरगडावरुन आलेल्या मशाल यात्रेकरुंनी असलोद, ता.शहादा येथे ज्योत आणली. या ज्योतीच्या माध्यमातून तेथील सप्तशृंगी माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. असलोद येथील पदयात्रा मित्रमंडळामार्फत मागील सात वर्षापासून पदयात्रा काढण्यात येत आहे. सहा वर्षे या मंडळाने सप्तशृंगी गडावर पदयात्रा काढली होती. तेथून मशाल यात्रेच्या रुपात गडावरुन ज्योत आणली जात होती. त्या ज्योतीच्या माध्यमातून असलोद येथील सप्तशृंगी माता मंदिरात आदिशक्ती देवीची स्थापना करण्यात आली होती. यंदा मात्र माहूरगडावर पदयात्रा काढण्यात आली होती. तेथून पुन्हा मशाल यात्रा काढत गडावरुन ज्योत आणली. या ज्योतीने देवीची स्थापना करण्यात आली. या मशाला यात्रेत भटू पाठक, धर्मा शिंदे, दिलीप राजभोज, उद्धव पाटील यांच्यासह 60 ते 65 जणांचा समावेश होता. नवरात्रोत्सवनिमित्त असलोद गावासह परिसरात  भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तरूणाई व महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नऊ दिवसात तेथे विविध कार्यक्रम  घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, असलोद येथून पायी कावडयात्राही काढण्यात येते. प्रकाशा येथील तापी नदीपात्रातून कावडयात्रेद्वारे पाणी नेण्यात येऊन गडावर यात्रोत्सव काळात सप्तशृंगी देवीचा जलाभिषेक करण्यात येतो. या कावडयात्रेतही भाविक सहभागी होतात.

पदयात्रेत प्रामुख्याने युवकांचा समावेश आहे. या युवकांनी माहूरगडावरुन ही ज्योत  केवळ 60 तासात असलोद येथे पदयात्रेने आणली. ज्योतीच्या माध्यमातून असलोदसह मंदाणे, म्हसावद, प्रकाशा, कोंढावळ, ब्राrाणपुरी  येथेही घटस्थापना करण्यात आली.