शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यापासून तोरणमाळची बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ  येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ  येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा दीड महिन्यापासून बंद आहे. परिणामी तोरणमाळसह अतिदुर्गम भागातील सुमारे 22 पाडय़ांवरील ग्रामस्थ व पर्यटकांना खाजगी प्रवासी वाहतूक सेवेवर अवलंबून रहावे लागत असून नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य परिवहन महामंडळाचे शहादा आगार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही बससेवा अद्याप सुरू झालेली नाही.सातपुडा पर्वत रांगात 1 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. 2 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे राणीपूर ते तोरणमाळ या 36 किलोमीटर अंतरावरील  घाट रस्त्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. जोर्पयत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोर्पयत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय शहादा आगाराने घेतला होता. 2 ऑगस्टपासून या मार्गावरील बससेवा आजही बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर कोसळलेल्या दरडीचा मलबा हटवण्यासाठी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काम करून रस्त्याची सुधारणा केली. मात्र सततच्या पावसामुळे या भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या. अखेर गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता मोकळा करण्यात विभागाला यश आले असले तरी येथील बससेवा मात्र अद्यापही बंद आहे. परिणामी या भागातील नागरिकांसह पर्यटकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे की, रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने तो प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्यास त्यांनी तसे प्रमाणपत्र दिल्यानंतर या मार्गावरून बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता क्लिअरन्सबाबत कुठलेही प्रमाणपत्र दिलेले नसल्याने अद्यापही या मार्गावरील बससेवा  बंद आहे. विशेष म्हणजे तोरणमाळ येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ मिनी बसचा वापर करते. प्रती बस 12 हजार रुपये परमिट असा या बससेवेसाठी कर आहे. मात्र बससेवा बंद असतानाही हा कर भरावा लागत असल्याने शहादा आगाराला आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.सद्यस्थितीत रस्ता दुरुस्त झाल्याने तोरणमाळ ते राणीपूर-म्हसावद खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. तोरणमाळच्या ग्रामस्थांना शहाद्याकडे येण्यासाठी सध्या याच वाहतूक सेवेवर अवलंबून राहावे   लागत आहे. त्यातच खाजगी  प्रवासी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याने ग्रामस्थांना नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. या रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने व पर्यटकांची खासगी वाहने जाऊ शकतात तर बससेवा का सुरू होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र शहादा आगाराला का देत नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य परिवहन मंडळाच्या शहादा आगार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या मार्गावर बससेवा कार्यान्वित होऊ शकलेली नाही व याचा नाहक जाच तोरणमाळच्या ग्रामस्थांसह पर्यटकांना सोसावा लागत आहे. या मार्गावरील बससेवा त्वरित पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांसह पर्यटकांनी केली आहे.