शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

vidhan Sabha 2019: चार पैकी तीन इच्छूक उमेदवार नवखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवसेनेतर्फे चार इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी तीनजण नवखे आहेत. अक्कलकुवा मतदारसंघासाठी इच्छूक आमशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिवसेनेतर्फे चार इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी तीनजण नवखे आहेत. अक्कलकुवा मतदारसंघासाठी इच्छूक आमशा पाडवी यांनी गेल्या निवडणुकीत देखील सेनेतर्फेच उमेदवारी केली होती. दरम्यान, युतीचा निर्णय होतो किंवा नाही यावर शिवसेनेतील इनकमींग अवलंबून राहणार असून इच्छुकांची संख्या आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून इच्छुकांच्या मुलाखती दोन दिवसांपूर्वी घेण्यात आल्या. यात नंदुरबार मतदारसंघासाठी मालती वळवी, शहादा मतदारसंघासाठी रिना पाडवी, अक्कलकुवा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी तर नवापूर मतदारसंघासाठी रमेश गोबजी गावीत यांनी मुलाखती दिल्या. नंदुरबार, शहादा आणि नवापूर मतदारसंघासाठी इच्छुक असलेले तिन्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर अक्कलकुवा मतदार संघातील इच्छुक तथा जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेतर्फे निवडणूक लढविली होती. यंदा पुन्हा ते इच्छूक आहेत.दरम्यान, भाजप-सेना युती होते किंवा नाही यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. प्राथमिक तयारी म्हणून शिवसेनेने चारही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. युती झाली नाही तर शिवसेनेत देखील काही प्रमाणात इनकमींग राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार आहे. परिणामी ऐनवेळी काही बदल होऊ शकतात अशी शक्यताही शिवसेनेच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत युती झाली नव्हती. शहादा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी राजेंद्रकुमार गावीत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी केली होती. परिणामी सुरेश नाईक यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. नंदुरबारातून विरेंद्र वळवी, नवापूरातून ज्योत्सना नाईक व अक्कलकुवातून आमशा पाडवी उमेदवार होते.