प्रकाशा येथे तीन दिवस लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:44+5:302021-03-28T04:28:44+5:30

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची साखळी तुटावी, यासाठी प्रकाशा ग्रामपंचायतीने तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. ...

Three days lockdown at Prakasha | प्रकाशा येथे तीन दिवस लॉकडाऊन

प्रकाशा येथे तीन दिवस लॉकडाऊन

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची साखळी तुटावी, यासाठी प्रकाशा ग्रामपंचायतीने तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस पूर्णतः लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे गावातील रस्ते निर्मनुष्य झाले असून, सर्वत्र शांतता आहे. बसथांबा परिसरात फक्त मालवाहू ट्रक, अवजड वाहने यांचीच ये-जा दिसून आली. गावातील सर्व दुकाने बंद ठेवली होती. सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस प्रशासन, तलाठी यांनी बंदचा आढावा घेतला व सकाळी गावात फिरून पाहणी केली. अत्यावश्यक सेवा- रुग्णालये, मेडिकल, दूध, पेपर विक्रेता आदींशिवाय कुठलीही दुकाने उघडली नव्हती. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाशा ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. ग्रामस्थांनी एक दिवस आधीच भाजीपाला, किराणा आदी भरून ठेवले होते. त्यामुळे कुठेही अडचण दिसून आली नाही.

Web Title: Three days lockdown at Prakasha