शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
7
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
8
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
9
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
10
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
11
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
12
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
13
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
14
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
15
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
16
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
17
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
18
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
19
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
20
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बेलीपाड्यात चवताळलेल्या अस्वलाचा तिघांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 17:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील बेलीपाडा येथील तिघांवर चवताळलेल्या अस्वलाने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली़ शेतात अचानक ...

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील बेलीपाडा येथील तिघांवर चवताळलेल्या अस्वलाने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली़ शेतात अचानक अस्वल आल्याचे सांगण्यात आले आहे़ हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
मोहिदा येथे सोमवारी रात्री घडलेल्या घटनेपाठोपाठ बुधवारी सकाळी लागलीच घडलेल्या घटनेमुळे भितीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे़ बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाचे पथक येथे दाखल झाले होते़ त्यांनी घटनास्थळावर पंचनामा करत अस्वलाचा शोध सुरु केला आहे़ याठिकाणी अस्वलाच्या पायाचे ठसेही मिळून आले आहेत़
बेलीपाडा येथील शेतकरी नारायण गणा वळवी हे शेतात बोअरमध्ये मोटार टाकत असताना अचानक त्यांच्या पाठीमागे येवून अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला़ यात त्यांच्या पाठीसह पृष्ठभागाचे लचके तोडून जखमी केले़ प्रसंगावधान राखत नारायण वळवी यांनी अस्वलाच्या तावडीतून सुटून पळ काढला़ याचवेळी समोरुन येणारा ११ वर्षीय मुलगा अनिल जयसिंग वसावे याच्याकडे अस्वलाने मोर्चा वळवला़ त्याच्यावर हल्ला चढवून पोट आणि हाताचा चावा घेत गंभीर जखमी केले़ बालकाच्या ओरडण्याने तेथून पळालेल्या अस्वलाने जवळच्या शेतात पीकांना पाणी देणाऱ्या अशोक चंदू तडवी यांच्यावरही हल्ला केला़ तडवी यांनी अस्वलाला प्रतिकार करुन त्यांच्या पायाला चावा घेत जखमी केले़ सकाळी साडेदहा वाजेपासून पाऊण तास हा थरार सुरु होता़ शेतातून जखमी अवस्थेत घराकडे गेलेल्या नारायण वळवी यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी शेतशिवारात धाव घेत अस्वलाला हुसकावून लावले होते़ तिघांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून तिघांची प्रकृती सुधारत असल्याचे वनविभागाने सांगितले आहे़
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल वासुदेव माळी, ए़सी़पाटील, वनरक्षक आऱजे़शिरसाठ, विरसिंग पावरा, अमित पाडवी यांनी बेलीपाडा गाठून माहिती घेतली़


पाहणी करणाऱ्या वनविभागाच्या पथकाला अस्वलाच्या पायाचे ठसे दिसून आल्यानंतर त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे़ हे अस्वल याच भागात फिरत असावे असा अंदाज असल्याने तीन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत़ परीसरातील गावाच्या सरपंचांना सूचना करुन गावांमध्ये एकट्यादुकट्याने कोणी फिरु नये याबाबत सूचित करण्यात आले आहे़
खरीपपूर्व कामे सुरु असल्याने शेतकरी शेतशिवारातच त्यावेळी हा प्रकार घडला़ गावापासून शेत जवळ असल्याने तातडीने सर्व जण धावून आल्याने तिघांचा जीव वाचला आहे़ दरम्यान या भागात वनविभागाचे पथक गस्त करणार आहे़ अस्वलाने केलेल्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली असून यापूर्वी असा प्रकार घडलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे़


अवघ्या दोन दिवसात अस्वलाने केलेल्या हल्ल्याचे गूढ वाढले आहे़ दोन्ही घटनांमध्ये अस्वलाला असुरक्षित वाटेल अशी कोणतीही कृती हल्ला झालेल्यांकडून करण्यात आलेली नाही़ बेलीपाड्यात शेतकरी नारायण वळवी हे मोटार टाकत असताना बेसावध होते़ त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला़ उर्वरित दोघेही बेसावध असताना अस्वलाने त्यांच्याकडे मोर्चा वळवला़ मोहिदे येथील शेतकरी ट्रॅक्टरवरुन खाली उतरल्यानंतर बांधावर उभे असताना अस्वलाने हल्ला केल्याने वन्यजीव अभ्यासकांची मदत घेऊन तपास करण्याची गरज आहे़