नवापुरातील ताईवाड्यातून ६० हजाराचे दागिने लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:02 IST2019-12-27T12:02:07+5:302019-12-27T12:02:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरातील ताईवाड्यात बंद घर फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला़ बुधवारी ...

Thousands of jewelry were removed from Taivada in Navapur | नवापुरातील ताईवाड्यातून ६० हजाराचे दागिने लांबवले

नवापुरातील ताईवाड्यातून ६० हजाराचे दागिने लांबवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर शहरातील ताईवाड्यात बंद घर फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला़ बुधवारी सकाळी ६ वाजता चोरीचा हा प्रकार समोर आला़
ताईवाड्यातील मुश्ताक नासीर ताई यांचे आजोबा हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने त्यांचे घर बंद होते़ दरम्यान २४ ते २५ डिसेंबर दरम्यान रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत साडेसतरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, आठ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा ६० हजार हजार रुपयांचा मुद्देमाल व २ हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला़
याप्रकरणी मुश्ताक ताई यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Thousands of jewelry were removed from Taivada in Navapur