शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्यांना जेरबंद करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

तळोदा शहरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात, अक्कलकुवा व ...

तळोदा शहरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात, अक्कलकुवा व तळोदा भागात व्यापारी वर्गाला दिवसाढवळ्या लुटण्याचे प्रकार मागील काळात सतत सुरू होते. मात्र, पोलीस प्रशासनाने लुटारूंचा बंदोबस्त केला असल्याने या कारवायांना ब्रेक लागला आहे. दरम्यान, अक्कलकुवा येथे टायर पंक्चर करून लुटीचा प्रकार घडला असून, दर आठवड्याला किरकोळ व होलसेल व्यापाऱ्यांना वसुलीसाठी जावे लागते. त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची लूट केली जात असल्याने चिंता वाढल्या आहेत. निवेदनावर किराणा असोसिएशनचे धनराज जैन, पंकज पटेल, सराफ संघटनेचे प्रसाद सराफ, आनंद सोनार, कापड व्यापारी संघटनेचे गौतम जैन, केमिस्ट संघटनेचे हुकूम जैन, आनंद सोनार, प्रकाश कोचर, सुभाष चोपडा, चंद्रकांत ठाकूर, भूषण सोनार, रवी जोहरी, सुभाष चोपडा, सुभाष जैन, दिलीप जैन, पंकज पाटील, निखिल तूखरिया, राजेंद्र कोचर, राहुल जैन यांच्या सह्या आहेत.

दरम्यान, तळोदा व अक्कलकुवा परिसरात व्यापाऱ्यांची लूट करणारी टोळी असल्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये व व्यापारी वर्गाला निर्भयपणे त्यांच्या मालाची रक्कम सुरक्षित नेण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांचा वेळीच छडा लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काळात लुटमारीचे प्रकार घडले होते. त्यामधील काही गुन्ह्यांचा तपास अजूनही लागलेला नाही. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आहेत. या घटनांमधील अज्ञात चोरट्यांच्या शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अक्कलकुवा येथे व्यापाऱ्याच्या गाडीतून पैसे लांबविण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्गावर ठिकठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांतील आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांकडून योग्य तपास सुरू असल्याची माहिती दिली.