शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या मोर्चा आता पांढऱ्या सोन्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. उत्पन्न निम्म्यावर आले आहे. असे असतांना आता शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. वेचनीवर आलेला कापूस शेतातूनच रात्रीच्या वेळी चोरून नेण्याचा प्रकार नंदुरबार व शहादा तालुक्यात वाढला आहे. सहा ते सात घटनांमध्ये दीड ते दोन लाखांचा कापूस आतापर्यंत चोरीस गेला आहे.यंदा कापूस आणि कांद्याला बºयापैकी भाव मिळत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा या दोन्ही पिकांची उत्पादकता निम्म्यावर घटली आहे. त्याचा परिणाम भाववाढीत झाला आहे. ज्या शेतकºयांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना बºयापैकी भाव मिळत आहे. असे असतांना आता चोरट्यांच्या धुमाकुळमुळे शेतकºयांच्या हाती येणारे उत्पन्न देखील हिरावले जात असल्याचे चित्र सध्या नंदुरबार व शहादा तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाचे सर्वाधीक क्षेत्रयंदाही खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे होते. एक लाखापेक्षा अधीक हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु अती पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला, सततच्या पावसामुळे पीक पिवळे पडले. यामुळे उत्पादकता निम्म्यावर घसरली. वेचणीची वेळ आल्यावर अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळेही कापूस खराब झाला.भाव चांगला असल्यानेसध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला ५३०० ते ५५०० रुपये प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. यापुढे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस चोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी किमान चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेला तरी ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागत आहे. त्यामुळे पांढºया सोन्याच्या संरक्षणासाठी आता शेतकºयांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. काही शेतकरी भितीपोटी पोलिसात तक्रार देत नाहीत. रात्रीच्या वेळी कापूस वेचणी करून ती रातोरात लंपास करण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर पाच ते सहा संख्येने चोरटे रात्री कापूस वेचनी करीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.दहशतीचे वातावरणपाच ते सहाच्या संख्येने चोरटे कापूस वेचणीसाठी येत असल्याचा अंदाजाने एकटा शेतकरी किंवा रखवालदार त्यांचा सामना करू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे काही शेतकरी आता स्वत: गटागटाने शेत शिवारात गस्त घालण्यासाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.भाव समाधानकारकसध्या कापसाला भाव समाधानकारक मिळत आहे. खेडा खरेदीत शेतकºयांना घरबसल्या ४८०० ते ५१०० रुपये भाव मिळत आहे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर प्रतवारीनुसार थेट ५५०० रुपये भाव मिळू लागला आहे. ही बाब पहाता कापूस यंदा भाव खात असला तरी चोरीच्या घटनांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.