शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सिमेवर विशेष सतर्कता बाळगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : विधानसभा निवडणुकीच्या काळात  राज्याच्या सीमेवर अनेक घटना घडत असतात. या पाश्र्वभुमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : विधानसभा निवडणुकीच्या काळात  राज्याच्या सीमेवर अनेक घटना घडत असतात. या पाश्र्वभुमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी मध्यप्रदेश राज्यातील खेतिया तालुका पानसेमल येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला शहादा उपविभागीय प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे पानसेमलचे प्रांताधिकारी सुमेरसिंग मजालदा, शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पानसेमल तहसीलदार राकेश सरी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, धडगाव पोलीस निरीक्षक डी. एम. गवळी, पानसेमल पोलीस निरीक्षक सी.एस. बागेला, खेतिया पोलीस निरीक्षक एम. एम. मालविय, म्हसावदचे साहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे,  नायब तहसीलदार जागर रावत व इतर अधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये, अनुचित प्रकार घडू नये यासंदर्भात चर्चा झाली. फरारी आरोपी, पाहिजे असलेले आरोपी यांचा शोध घेणे, अवैध दारू वाहतूक, शस्त्रांची तस्करी याबाबत विशेष तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. दोन्ही राज्यातील पोलिसांनी सतर्क राहण्याचेही सपकाळे यांनी सांगितले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार असून नाकाबंदीतील कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी नंबर एकमेकांना तसेच सोशल  मिडिया ग्रुप तयार करून महत्त्वांच्या घडामोडीची माहिती त्वरित पाठवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

जिल्ह्यातील चारही मतदारसंघ हे मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर येतात. त्यामुळे चारही मतदार संघाच्या लागून असलेल्या या दोन्ही राज्यातील जिल्ह्यांमधील अधिका:यांची सुरुवातीला बैठक होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी   आणि पोलीस अधीक्षक स्तरावरील बैठकी होणार आहेत. त्यामुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे.