शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

33 गावातील अनेक कुटूंबे बुडीताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधीतांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधीतांचे घर, शेती बुडीतात जात आहे. अनेकांना विस्थापीत होण्याची वेळ आली असतांना प्रशासन ढिम्म आहे. बुडीतांचे पंचनामे करून तातडीने जे बाधीत घोषीत व्हावयचे असतील त्यांना तातडीने घोषीत करावे या मागणीसाठी नर्मदा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिका:यांशी चर्चेनंतर निवेदन देण्यात आले.सरदार सरोवर प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे राज्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील 33 गावांमधील स्थिती विदारक झाली आहे. जे कुटूंब अद्यापही बुडीत क्षेत्रात आहेत त्यांची स्थिती विदारक आहे. त्याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिका:यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरदार सरोवर पुर्ण क्षमतेने भरण्यास मंजुरी देणे हा विरोधाभास व राजकीय कारस्थानाचा भाग दिसून येतो. यापूर्वी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 15 ऑक्टोबर र्पयत धरण पुर्ण संचय पातळीर्पयत म्हणजेच 138.68 मिटर एवढे भरणे अपेक्षीत होते. यापूर्वी दिलेल्या निवेदनातही याबाबत सुचित करण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही. पाणी पातळी 122 मिटर र्पयत ठेवण्यासाठी संबधीत विभागाला अवगत करावे असे ठरलेले असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले. बुडीतात आलेली घरे, शेती याबाबत उपाययोजना कराव्या व बुडीतांचे पंचनामे करावे. प्रकल्पबाधीतांसाठी जमीन खरदेची प्रक्रिया राबवावी. वेळापत्रक लावून सिमांकन व भू-अभिलेख तयार करण्याची कामगिरी पुढे न्यावी. ज्या प्रकल्पबाधीतांची घरे, जमिनी 138.68 च्या खाली आजही आहेत व जे घोषीत नाहीत त्यांना तात्काळ घोषीत करून त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा. भूसंपादन, सिंचनसुविधा, घरप्लॉट देणे, सिमांकन, सातबारा  आदी पुनर्वसनाची कामे गतीने पुढे जाणे अपेक्षीत होते ते मात्र झाले नाही. ज्यांची घरे बुडाली त्यांना तात्काळ तात्पुरते निवारे बांधून देणे नर्मदा विकास विभागाचे काम आहे ते झालेले नाही. मणिबेली येथील नर्मदा जीवन शाळा पाण्याने वेढली गेली आहे. सर्वच 33 गावे पाण्याखाली गेल्याने बाधितांना खाण्यास अन्न नाही, राहण्यास जागा नाही. सरकारी यंत्रणा केवळ दौरे करण्यात व्यस्त असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला.जिल्हाधिका:यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी ओरसिंग पटले, किरसिंग वसावे किर्ता वसावे, नुरजी वसावे, चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्यासह आंदोलक सहभागी झाले होते. नर्मदा जीवन शाळेला देखील पाण्याचा वेढा पडला आहे. विषारी सर्प, मगरी आणि इतर सरपटणारे प्राणी यांचा धोका विद्याथ्र्याना आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना आता या आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. शिक्षणावरही त्यांचा परिणाम होत आहे. यावेळी जीवन शाळेतील विद्यार्थी देखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांनी आदिवासी भाषेत गाणी गात लक्ष वेधले.