शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होतेय शाळांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी व बारावी परीक्षांच्या संभांव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची सिलॅबस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावी व बारावी परीक्षांच्या संभांव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची सिलॅबस पुर्ण करण्याची धडपड सुरू झाली आहे. सिलॅबस पुर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, प्रॅक्टीकल परीक्षा घेण्याची कसरत करावी लागणार आहे. दहावी व  बारावीच्या वर्गांना यंदा अनेक अडथळे आले. पहिले सत्र तर केवळ ॲानलाईन शिकविण्यावर गेले. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर अभ्यासक्रमाची गाडी थोडीफार रुळावर आली. गेल्या दीड महिन्यात बऱ्यापैकी अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे. आता येत्या दीड ते दोन महिन्यात उर्वरित अभ्याक्रम पुर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. विद्यार्थी देखील घोकंपट्टी करीत आहेत. जास्तीत जास्त अभ्यासक्रम पुर्ण व्हावा व त्याची रिव्हजन व्हावी यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. 

सिलॅबस पुर्ण होणार...दहावीचा सिलॅबस पुर्ण करण्यासाठी शिक्षकांचा पुर्ण प्रयत्न सुरू आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा आहे. प्रत्यक्ष शिकविण्यासाठी साडेतीन ते चार महिने मिळत आहेत. 

नवीन सिलॅबसमुळे अडचणबारावीचा यंदापासून नवीन सिलॅबस आहे. त्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. नंतर मात्र, २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वेळेत सिलॅबस पुर्ण करण्याकडे कल आहे. 

सराव परीक्षा होणार...लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करून सराव परीक्षा घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. विषय शिक्षक काही वेळा अतिरिक्त तासिका देखील घेत आहेत. आता पालकांनी पाल्यांना जास्तीत जास्त संख्येने शाळेत पाठवावे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. 

कमी झालेला अभ्यासक्रम, ॲानलाईनमुळे आलेला सुटसुटीतपणा यामुळे दहावीचा अभ्यसक्रम पुर्ण करण्याकडे कल आहे. नियमित सराव परीक्षा, रिव्हजन घेतले जाईल. पालकांनीही पाल्यांना शाळेत पाठवून सहकार्य करावे.-भारती सूर्यवंशी,मुख्याध्यापिका, नंदुरबार

शाळेकडून अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त तासिका देखील घेतल्या जात आहेत. आता लवकरच सराव परिक्षांना सुरुवात होईल. त्यामुळे ताण काहीसा हलका झाला आहे.                                   -सुनील पवार, विद्यार्थी, दहावी.

यंदा अभ्यासक्रम बदलला, त्यातच पहिले टर्म घरी बसून शिकावे लागले. आता प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाचा बराचसा ताण कमी झाला आहे. त्यामुळे फारशा अडचणी येणार नाहीत.                           -ललिता पाटील,विद्यार्थीनी,बारावी.