शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे; जि.प.अध्यक्ष सीमा वळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

प्रतापपूर : कोरोनवर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नसून, ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे ...

प्रतापपूर : कोरोनवर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नसून, ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकारी यांनी स्वतः लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर होईल व ग्रामस्थांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी प्रतापपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटी दरम्यान व्यक्त केला.

तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, पोलीस पाटील बबन इंद्रजित, ग्रामपंचायत सदस्य सुरेश इंद्रजित, वैद्यकीय अधिकारी योसेफ गावीत, राहुल पावरा, मनोज इंद्रजित, राजेंद्र गिरासे, उपस्थित होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.योसेफ गावीत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी केंद्रातील कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या कंबर कसून कामाला लागले असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणावर गावागावातून जनजागृती होत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होत असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वळवी यांनी प्रतापपूर केंद्राच्या पूर्णत्वास येणाऱ्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी लसीकरणासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश पावरा, डॉ.योसेफ गावीत, आरोग्य सेवक एस.बी. जाधव ,आरोग्यसेविका वर्षा पाडवी, सपना वळवी, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा ठाकूर, अंगणवाडी सेविका, आशा गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्या परिश्रम घेत आहेत.