शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला अजूनही 14 हजार शेतक:यांकडे पीक कर्ज थकबाकी

By admin | Updated: May 15, 2017 18:26 IST

यंदा खरीप पीककर्ज वाटप करण्यात येत आह़े यामुळे तब्बल 14 हजार शेतकरी यंदा बँकेच्या पिक कर्जाविनाच राहण्याची चिन्हे आहेत़

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 15 - धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून गतवर्षी पीककर्ज घेऊन 31 मार्च 2017 अखेरीस कर्ज परतावा करणा:या शेतक:यांनाच यंदा खरीप पीककर्ज वाटप करण्यात येत आह़े यामुळे तब्बल 14 हजार शेतकरी यंदा बँकेच्या पिक कर्जाविनाच राहण्याची चिन्हे आहेत़ 
नंदुरबार जिल्ह्यातील बँकेच्या 30 शाखांमधून बँकेचे शेतकरी सभासद,  विविध कार्यकारी संस्था, पीककर्ज संस्था यांना खरीप पिकांसाठीचे हे कर्ज वाटप करण्यात येत आह़े गेल्या वर्षी बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमात सहभाग घेत शेतक:यांना एटीएम कार्ड व रूपे कार्ड देऊन कर्ज वाटप करण्याचा फसवा प्रयोग केला होता़ या प्रयोगात यश न आल्याने यंदापासूून जिल्हा बँकेकडून विड्रॉल स्लिपच्या आधारे कर्ज वाटप करण्यात येत आह़े गरजू शेतकरी स्व-धनादेश देऊनही कर्ज घेत आहेत़
10 कोटींच्या कर्जाचे वाटप
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने नंदुबार जिल्ह्याच्या विविध भागातील 30 शाखांमध्ये गेल्यावर्षी खरीप हंगामात 19 हजार 944 शेतकरी सभासदांना 127 कोटीं रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होत़े वाटप करण्यात आलेल्या  127 कोटी रूपये कर्जापैकी 31 मार्च 2017 र्पयत 5 हजार 446 शेतक:यांनी 31 कोटी 23 लाख परत करून कजर्फेड केली होती तर तब्बल 14 हजार 498 जणांकडे 68 कोटी 6 लाख थकबाकी आह़े
पाच हजार 446 शेतक:यांपैकी केवळ तीन हजार 548 शेतक:यांना 10 कोटी 12 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आह़े सुमारे 18 टक्के वाटप करण्यात आलेल्या या कर्जाच्या वाटपात सुधारणा होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े कजर्भरणा न करणा:या शेतक:यांन कर्ज न देण्याची भूमिका बँकेने घेतली आह़े
नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांना गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन येऊनही नुकसानदायक ठरले आहेत़ खरीप पिकांच्या काढणीनंतर रिझव्र्ह बँकेने नोटाबंदीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला़ या निर्णयाने शेतक:यांचे सर्वाधिक नुकसान झाल़े बाजारात उत्पादन विक्रीसाठी आणले असताना, हा निर्णय झाल्याने ‘कॅशलेस’ झालेल्या व्यापा:यांनी शेतक:यांना प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात शेतमाल खरेदीचे पैसे दिल़े हाती आलेले हे पैसे शेतक:यांनी रब्बी उत्पादन घेण्यासाठी लावले होत़े यात गहू, हरभरा व रब्बी ज्वारी यांचे उत्पादन समाधानकारक आले असले, तरी भाव नसल्याने शेतक:यांना ‘ना नफा ना तोटा’ या प्रमाणे उत्पादनांची विक्री करावी लागली़ हाती पैसाच नसल्याने गेल्या खरीपचे पैसे भरणार कुठून असा जिल्ह्यातील बागायत आणि कोरडवाहू शेतक:यांकडून उपस्थित करण्यात येत आह़े
 
बँक कर्ज देत नसल्याने अनेक शेतक:यांचे आर्थिक गणित संकटात आह़े ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचे आणि बँकेचे संबंध हे जुने आहेत़ त्यामुळे बँकेने शेतक:यांना विश्वासाच्या जोरावर कर्ज दिले पाहिज़े याआधीही बँकेने कठोर निर्णय घेतले आहेत़ पण ते निर्णय शेतकरी हिताचे होत़े आता घेतलेला निर्णय हा शेतक:यांच्या भवितव्याच्या विरोधातील आह़े
- ब्रिजलाल छगन चव्हाण, शेतकरी, मोड़ ता़ तळोदा़