पोल्ट्रीमधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:34 IST2019-12-19T11:34:53+5:302019-12-19T11:34:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील पाचोराबारी शिवारातील पोल्ट्री फार्ममधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ ...

 Theft of two and a half thousand chickens from poultry | पोल्ट्रीमधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी

पोल्ट्रीमधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील पाचोराबारी शिवारातील पोल्ट्री फार्ममधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ चोरट्यांनी एकाच रात्रीतून ही चोरी केल्याची माहिती देण्यात येत आहे़
कासीम कय्यूूम खाटीक रा़ नंदुरबार यांच्या मालकीचा पोल्ट्री फार्म खामगाव गावाच्या पुढे पाचोराबारी रस्त्यावर आहे़ गावापासून जवळ असलेल्या पोल्ट्रीमधून सोमवारी मध्यरात्र ते मंगळवारी पहाट या दरम्यान १ लाख ४६ हजार ९६० रुपये रुपये किमतीच्या २ हजार ६७२ कोंबड्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या़ सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कासीम खाटीक यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरीच्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्या मोठ्या वाहनातून चोरटे घेऊन गेले असावेत असा अंदाज आहे़

Web Title:  Theft of two and a half thousand chickens from poultry