पोलिसाच्या ताब्यातील ई-चालान मशीनची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:47 IST2020-02-14T12:47:39+5:302020-02-14T12:47:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाहनांवर कारवाई करण्यासाठी वापरात येणारे व ३५ हजार रुपये किंमत असलेले ई-चालान मशीन पोलिसाच्या ...

 Theft of e-invoicing machines in police custody | पोलिसाच्या ताब्यातील ई-चालान मशीनची चोरी

पोलिसाच्या ताब्यातील ई-चालान मशीनची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाहनांवर कारवाई करण्यासाठी वापरात येणारे व ३५ हजार रुपये किंमत असलेले ई-चालान मशीन पोलिसाच्या ताब्यातूनच चोरीस गेल्याची घटना अक्कलकुवा येथे १० फेब्रुवारी रोजी घडली.
अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई धनंजय धनगर यांच्याकडे ई-चालान मशीन देण्यात आले होते. त्यांची १० फेब्रुवारी रोजी कालिका माता यात्रोत्सवात मंदीर परिसरात ड्युटी होती. त्यांच्या ताब्यातील मशीन चोरट्यांनी लांबविले. त्याची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे. ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून न आल्याने पोलीस शिपाई धनंजय धनगर यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Theft of e-invoicing machines in police custody