जिल्ह्यात कोरोना ब्रॉड डेडची दहा प्रकरणे, सर्वच वयोवृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST2021-03-06T04:29:51+5:302021-03-06T04:29:51+5:30

नंदुरबार : कोरोनाचे ब्रॅाड डेडचे जिल्ह्यात दहा प्रकरणे झाली. सर्वच ६० पेक्षा अधिक वयोगटाचे होते. यापैकी एकाचेही शवविच्छेदन न ...

Ten cases of Corona Broad Dead in the district, all elderly | जिल्ह्यात कोरोना ब्रॉड डेडची दहा प्रकरणे, सर्वच वयोवृद्ध

जिल्ह्यात कोरोना ब्रॉड डेडची दहा प्रकरणे, सर्वच वयोवृद्ध

नंदुरबार : कोरोनाचे ब्रॅाड डेडचे जिल्ह्यात दहा प्रकरणे झाली. सर्वच ६० पेक्षा अधिक वयोगटाचे होते. यापैकी एकाचेही शवविच्छेदन न करता कोरोनाच्या नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात किमान दहा जणांचा कोरोना संशयित म्हणून मृत्यू झाला होता. जिल्हा रुग्णालयात असे मृतदेह आल्यावर त्यांचे स्वॅब पॅाझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांचे शव विच्छेदन न करता कोरोनाच्या नियमावलीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दहापैकी आठजण हे खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात आले होते. तर दोघांचा शासकीय रुग्णालयात आणतांना रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यांची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केल्यानंतर ते पॅाझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या घराच्या व संपर्कातील लोकांनाही क्वॅारंटाईन करण्यात आले होते.

ब्रॉड डेडच्या एकाही मृतदेहाचे शासनाच्या नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आलेले नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते यांनी सांगितले.

Web Title: Ten cases of Corona Broad Dead in the district, all elderly