स्वामी समर्थ केद्राच्यावतीने शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:23+5:302021-07-30T04:32:23+5:30

या वेळी कोरोना नियम पाळून सर्व शिक्षक व सेवेकऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणचे महत्व कळावे म्हणून शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवून ...

Teachers felicitated on behalf of Swami Samarth Kedra | स्वामी समर्थ केद्राच्यावतीने शिक्षकांचा सत्कार

स्वामी समर्थ केद्राच्यावतीने शिक्षकांचा सत्कार

या वेळी कोरोना नियम पाळून सर्व शिक्षक व सेवेकऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणचे महत्व कळावे म्हणून शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण केले. या सामाजिक उपक्रमांतून आम्हां सर्व शिक्षकांना एक उत्साह व प्रेरणा मिळाल्याचा अनुभव शिक्षकांनी सांगितला.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात बाल संस्कार केंद्र चालवणे, मातीचे गणपती बनवणे, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे, शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करणे या सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अध्यात्मासोबत संस्काराचे तसेच व्यावहारिक ज्ञानाचे धडे दिले जातात. या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक रूपेश चौधरी, पी.के.पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र फळकाळ, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी, प्रल्हाद मगरे, अरविंद अहिराव श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी व सर्व सत्कारार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Teachers felicitated on behalf of Swami Samarth Kedra