शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे टारगट युवकांचे फावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध शाळा, महाविद्यालयांचा परिसर आणि चौकातील टारगट युवकांचा उच्छाद पुन्हा वाढला आहे. शहर आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध शाळा, महाविद्यालयांचा परिसर आणि चौकातील टारगट युवकांचा उच्छाद पुन्हा वाढला आहे. शहर आणि उपनगर पोलिसांच्या निष्क्रियता त्याला कारणीभूत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चौकाचौकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. नंदुरबारातील रोडरोमियो युवकांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. यामुळे महिला, तरुणी आणि विद्यार्थीनी हैराण झाल्या आहेत. ठिकठिकाणी अशा युवकांचे टोळके शहरात दिसून येते. विशेषत: शाळांच्या आवारात आणि खाजगी क्लासच्या आवारातील हे टोळके पोलिसांच्या नाकावर टिच्चून टारगटपणा करीत आहेत.चौकाचौकात वावर..शहरातील  डी. आर.विद्यालयासमोरील चौक आणि दिनदयाल चौक, श्रॉफ विद्यालयासमोरील चौक, मोठा मारुती मंदीर परिसर, कमला नेहरू कन्या विद्यालय आणि एकलव्य विद्यालय परिसर, मिशन विद्यालय परिसर, जीटीपी कॉलेज परिसर आदी भागात या युवकांचा नेहमीच वावर असतो. अशा भागातून जाणा:या महिला, तरुणी, विद्यार्थीनी यांना त्रास देण्याचा प्रकार या युवकांकडून केला जातो. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी पोलिसांचे दामीनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त शाळा परिसरात आणि चौकांमध्ये राहत होती. त्यामुळे टारगट युवकांना आळा बसला होता. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांची गस्तच बंद झाली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांची निष्क्रीय भुमिका त्याला कारणीभूत ठरली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनीच संबधीत अधिका:यांचे कान टोचावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेशहरातील काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु अनेक मुख्य चौक व धार्मिक  स्थळ आणि शाळा परिसर त्यापासून सुटले आहेत. त्यामुळे नव्याने सव्र्हे करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत आहे. सध्या सर्वात रहदारीचा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून मोठा मारुती मंदीर परिसर ओळखला जातो. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक आहे. या शिवाय दिनदयाल चौकात देखील कॅमेरे वाढविण्याची आवश्यकता आहे. याबाबत पोलीस दलाने गांभिर्याने घेणे आवश्यक   आहे.