खापर येथे शिक्षक परिषदेची तालुकास्तरीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:15+5:302021-03-22T04:27:15+5:30

याप्रसंगी दीपक वसावे यांची अक्कलकुवा तालुका सहकार्यवाह पदी,वालंबा केंद्र संघटकपदी जितेंद्र वसावे, मोरंबा केंद्राच्या केंद्र संघटक पदी ...

Taluka level meeting of teachers council at Khapar | खापर येथे शिक्षक परिषदेची तालुकास्तरीय बैठक

खापर येथे शिक्षक परिषदेची तालुकास्तरीय बैठक

याप्रसंगी दीपक वसावे यांची अक्कलकुवा तालुका सहकार्यवाह पदी,वालंबा केंद्र संघटकपदी जितेंद्र वसावे, मोरंबा केंद्राच्या केंद्र संघटक पदी स्वप्नील बागल व दिनेश आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील उपस्थित शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेण्यात आले, वस्तिशाळा शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिलांच्या थकीत वेतनाचा प्रश्न, भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रश्न याबाबत शालेय लेखापरीक्षण करण्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करावे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय उपाध्यक्ष आव्हाड, जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव, जिल्हा कार्यवाह नितेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, संपर्क अधिकारी नागेश वसावे आदी उपस्थित होते. तालुका सहकार्यवाह जगदीश धसे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाऊसाहेब जाधव, रूपेश मोरे, कांतीलाल ओल्‍या वसावे, जगदीश पाडवी, सचिन बडोले , गणेश पावरा, सुनील पाडवी, सुनील मावची, राजू वळवी, छोटू पावरा, किसन वसावे आदी तालुका पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Taluka level meeting of teachers council at Khapar