शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : चार पोलीस अधिकारी व ५७ कर्मचाऱ्यांवर तळोदा तालुक्याचा कायदा व सुवस्थेचा भर असून, पुरेशा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : चार पोलीस अधिकारी व ५७ कर्मचाऱ्यांवर तळोदा तालुक्याचा कायदा व सुवस्थेचा भर असून, पुरेशा मनुष्यबळाअभावी तळोदा पोलिसांची दमछाक होते असल्याचे चित्र आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. कोरोणाविरूद्धच्या या लढाईत पोलीससुद्धा निर्णायक भूमिका पार पडतांना दिसून येत आहेत. परंतु अनेक ठिकाणी अपुºया मनुष्यबळाअभावी पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याची परिस्थिती आहे. त्याच्याच प्रत्यय तळोदा पोलीस ठाण्यात पाहायला मिळत आहे.तळोदा शहराची लोकसंख्या ३० हजाराच्या घरात असून, तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७० हजारापर्यंत आहे. तालुक्यात जवळपास १२८ गावे आहे. तळोदा पोलीस ठाण्यात आजच्या घडीला चार पोलीस अधिकरी व ५७ पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यात एक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश आहे. तळोदा पोलीस ठाण्यातील ५७ पोलीस कर्मचाºयांपैकी नऊ कर्मचारी हे प्रतिनियुक्तीवर असून, अन्य पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. प्रत्यक्षात ४८ कर्मचाºयांवर तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा डोलारा सुरू आहे. तळोदा शहराची व तालुक्याची लोकसंख्या विचारात घेता ही संख्या पुरेशी नसल्याची स्थिती आहे.जुन्या काळातील लोकसंख्या विचारात घेऊन तळोदा पोलीस ठाण्यात ७४ पदांना मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले जाते. परंतु सद्य:स्थितीतील लोकसंख्येचा विचार केला तर तळोदा पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ हे अपुरे असल्याचे लक्षात येते. त्यामुळे अधिक पदांना मान्यता मिळणे गरजेचे आहे. मान्यता असणाºया ७४ पदांपैकी चार अधिकारी व ५७ पोलीस कर्मचारी मिळून ६१ पदे कार्यरत आहेत तर उर्वरित १२ पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. ५७ कर्मचाºयांमध्ये मे महिन्याच्या अखेरीस चार ते पाच पोलीस कर्मचारी निवृत्त होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तळोदा पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांवर कामाचा अधिकच ताण पडण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनच्या अतिरिक्त बंदोबस्तासोबत दैनंदिन गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. संचारबंदीच्या काळात अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र असून, मागील काळात तळोदा पोलिसांनी धडक कारवाई करीत जुगार अड्यांवर धाडी टाकल्याचे दिसून आले. यासोबतच सोशल डिस्टन्सिनचे उल्लंघन करणारे, बेशिस्त मोटारसायकलधारक यांच्यावरदेखील पोलिसांकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु ही सर्व कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत असतांना अपुºया मनुष्यबळाअभावी तळोद्यात पोलिसांची दमछाक होतांना दिसून येत आहे. एका दिवसा आड पोलीस कर्मचाºयांना रात्रपाळीची ड्युटी लागत असून, आठ तासांच्या पहिल्या शिफ्टनंतर काही जणांना लागलीच दुसरी शिफ्ट देखील करावी लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचारी व अधिकारी प्रतिकूल परिस्थितीतदेखील कर्तव्य बजावत आहे.