शहाद्यात सहा ठिकाणी स्वॅब तपासणीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:27+5:302021-03-15T04:28:27+5:30

गेल्या काही दिवसापासून शहरातील वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. परंतु प्रशासनास पुन्हा एकदा नागरिकांची ...

Swab inspection facility at six places in Shahada | शहाद्यात सहा ठिकाणी स्वॅब तपासणीची सोय

शहाद्यात सहा ठिकाणी स्वॅब तपासणीची सोय

गेल्या काही दिवसापासून शहरातील वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. परंतु प्रशासनास पुन्हा एकदा नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी नागरिकांना संयम आणि शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील व्यापारी, त्यांच्याकडे काम करणारे कामगार, विक्रेते यांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यासाठी शहरात शासकीय विश्रामगृह, सप्तशृंगी माता मंदिर, टॅक्सी स्टॅण्ड, काझी चौक, नगरपालिका, मिशन हायस्कूल आदी सहा ठिकाणी वैद्यकीय पथके कार्यान्वित करून त्यांच्यामार्फत चाचणी सुरू केली आहे. कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपले उत्तरदायित्व पार पाडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याचे सांगण्यात आले. रविवारी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मिशन हायस्कूल परिसर, काझी चौक परिसर आदी भागात स्वतः फिरून व्यावसायिकांना रॅपिड अँटीजेन चाचणी करुन घेण्याचे आवाहन करीत संबंधितांना स्वॅबचे नमुने देण्यासाठी केंद्रावर पाठविले.

Web Title: Swab inspection facility at six places in Shahada