बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीतास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:35 IST2019-07-24T11:35:32+5:302019-07-24T11:35:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद, ता.शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत एक वषार्पासून फरार असलेल्या बलात्कारातील मुख्य आरोपीस मध्यप्रदेशातून अटक ...

Suspect arrested for rape conviction | बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीतास अटक

बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीतास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : म्हसावद, ता.शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत एक वषार्पासून फरार असलेल्या बलात्कारातील मुख्य आरोपीस मध्यप्रदेशातून अटक करण्यात म्हसावद पोलीसांना यश आले आहे. 
पोलीस सूत्रांनुसार, 14 सप्टेंबर 2018 रोजी भादल ता.धडगाव येथे येवून संशयीत आरोपी रूबाण्या डेमसिंग भिलाला रा.भिताडा, ता. सोंडवा, जि.अलिराजपूर(मध्यप्रदेश) याने जबरीने महिलेस भिताडा येथे पळवून नेवून दोन दिवस भिताडा येथे वांग-या ओंकारसिंग भिलाला याचे घरी ठेवून शाररिक अत्याचार केले. महिलेच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून आरोपी फरार होता. 
शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे, म्हसावदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे यांनी पोलीस कर्मचारी वर्गासह मध्यप्रदेश राज्यात जावून आरोपीस अटक केली. भिलाला यास न्यायालयात उभे केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, संशयीताच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले होते.     
 

Web Title: Suspect arrested for rape conviction