शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोलगी गाव पाच दिवस बंद ठेवत सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात मोलगी ता़ अक्कलकुवा येथे एकात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत़ त्याला जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात मोलगी ता़ अक्कलकुवा येथे एकात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत़ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपर्कातील सात जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ दरम्यान या पार्श्वभूमीवर मोलगी गाव तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़रविवारी मोलगी गावातील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या एकात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती़ तालुका आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत संबधिताला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवत त्याच्या संपर्कात आलेल्या सात जणांना खापर येथील क्वारंटाईन कक्षात नेले आहे़ यानंतर सोमवारी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार विजय कच्छवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांनी मोलगी येथे भेट देत माहिती जाणून घेतली़ दक्षता म्हणून मोलगी येथील काही भाग सील करण्यात आला असून बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे़ सरपंच मनोज तडवी व ग्रामसेवक संजय बागले यांच्या उपस्थितीत गावात जागोजागी फवारणी करण्यात आली़ आरोग्य विभागाने मोलगी येथे आठ पथकांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून गावात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे़ पथकात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्यासह आशा कार्यकर्तींचा समावेश करण्यात आला आहे़ गावासह आसपासच्या पाड्यांवर भेटी देत त्यांच्याकडून माहिती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान दुर्गम भागात कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्याने चिंता निर्माण झाली आहे़मोलगी हे गाव सातपुड्यातील गाव पाड्यांसाठी प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे़ दीर्घ कालावधीनंतर गावातील व्यवहार पूर्वपदावर येत होते़ परंतू कोरोनाची लक्षणे असलेला व्यक्ती आढळून आल्यानंतर पुन्हा गाव बंद करण्यात आले आहे़ तीन दिवसांनंतर व्यवहार सुरु होणार असल्याचे आसपासच्या पाड्यांवर दवंडी देऊन कळवण्यात आले आहे़