शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य.! जिल्ह्यात एकही बालकामगार नसल्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकही बालमजूर आढळला नसल्याची हास्यास्पद बाब शुक्रवारी झालेल्या बाल हक्क ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकही बालमजूर आढळला नसल्याची हास्यास्पद बाब शुक्रवारी झालेल्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुनावणीवेळी पुढे आले. यामुळे आयोगाचे सदस्य आणि जिल्हाधिकारी यांनीही आश्चर्य व्यक्त केले.   केंद्र सरकारने बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 केलेला आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा देखील केलेल्या आहेत. 14 वर्षाआतील मुलांना रोजगारावर संपुर्णपणे प्रतिबंध या कायद्यान्वये करण्यात आलेला आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील अनेक हॉटेल, वीट भट्टी, बांधकाम आदी ठिकाणी सर्रास बाल कामगारांना कामाला जुंपले जाते. यंदाच्या उन्हाळ्यात अर्थात मार्च महिन्यापासून ग्रामिण भागात कापूस वेचणीसाठी मोठय़ा प्रमाणावर मुलांनी शाळा सोडून कापूस वेचणीच्या कामाला गेले होते. दुष्काळी परिस्थितीत कुटूंबाला थोडाफार हातभार यातून लागला होता. परंतु याकडे बाल कामगार अधिकारी यांनी कधीही लक्ष दिले नसल्याची स्थिती आहे. गेल्या पाच वर्षात तर अशा प्रकारची एकही केस झालेली नसल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बैठकीत संबधीत अधिका:यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्या अधिका:यांनी पाच वर्षात जिल्ह्यात एकही बाल कामगार आढळला नसल्याचे स्पष्ट केले. यावर स्वत: जिल्हाधिकारी आणि आयोगाच्या सदस्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. यावेळी आयोगाचे सदस्य चिडले देखील. केवळ कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा फिल्डवर जा, कुणाच्या तक्रारीची वाट का पहाता म्हणून देखील सुनावल्याचे चित्र होते. शासनाने बालमजुरी प्रतिबंध व नियमन कायदा हा मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याकरीता मुलांच्या अधिकारासोबत जोडलेला आहे. हा कायदा 14 वर्षाआतील मुलांच्या रोजगारावर पुर्णपणे प्रतिबंधीत करते. याअंतर्गत संबधीत मालकांना शिक्षेची देखील तरतूद आहे. 

बाल कामगार अधिकारी व बाल न्यायालय याचा कारभार अद्यापही धुळे येथूनच सुरू आहे. यामुळे स्थानिक स्तरावर कारवाई करणे किंवा मोहिम राबविणे याबाबत अपेक्षीत काम दिसून येत नाही. स्थानिक ठिकाणी कार्यालय व पुरेसे कर्मचारी दिले गेले तर बाल मजुरांविषयीच्या मोहिमेला अधीक गती येऊ शकते. ही बाब बाल हक्क संरक्षण आयोगाच्याही लक्षात आली.