शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

गावाला साक्षर करण्याचा सुनीता पावरा यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

मूळच्या धडगावच्या असलेल्या सुनीता पावरा यांनी लग्नानंतर अंगणवाडीसेविका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाल्याने, त्यांना इच्छा ...

मूळच्या धडगावच्या असलेल्या सुनीता पावरा यांनी लग्नानंतर अंगणवाडीसेविका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाल्याने, त्यांना इच्छा असूनही शिक्षिका होता आले नाही. बालकांना शिकविण्याचे समाधान मिळावे, म्हणून त्यांनी अंगणवाडीसेविकेचे काम स्वीकारले. अंगणवाडीची इमारत सुंदर असावी, अशी त्यांची इच्छा होती. ग्रामपंचायतीकडून मिळणारा निधी पुरेसा नसल्याने, त्यांनी लोकसहभागातून इमारतीला सजविले. आताही प्रवेशद्वारासाठी त्यांनी पाच हजार रुपये गोळा केले असून, २५ हजारांचा निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बालकांचे पूर्ण शिक्षण चांगले झाल्यास पाया मजबूत होत असल्याने, त्यांनी अंगणवाडीतच नवे शैक्षणिक उपक्रम राबविले. टाकाऊ वस्तूपासून शैक्षणिक साहित्य तयार करून खेळणी, मॉडेल्स, खेळ, चित्रे, विविध वस्तूंच्या साहाय्याने मुलांना इथे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अंगणवाडीत येणारी मुले उत्साहाने वावरताना आणि चटकन प्रतिसाद देताना दिसतात. नव्या वस्तू तयार केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उत्साह देणारा असल्याचे त्या सांगतात. गावातील कुपोषण दूर करण्यातही त्यांना चांगले यश आले आहे. १९ कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. खासगी डॉक्टरांकडून उपचाराचा आग्रह धरून एका कमी वजनाच्या मुलीचे प्राणही वाचविले. महिलांना पाककृती करून दाखविणे, आहाराची माहिती देणे, घरातील पाककृती अंगणवाडीत आणण्यासाठी सांगणे व त्यात सुधारणा सुचविणे आदी उपक्रम कुपोषण कमी करण्यात उपयुक्त ठरले आहेत. डिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांनी सहज शिक्षणाची पद्धत अनुसरली आहे. त्यामुळे बाळगोपाळ अंगणवाडीत रमतात आणि आनंदी दिसतात. शिक्षण आणि व्यायाम यांचा समन्वय होण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पद्धती विकसित केल्या आहेत. त्यामुळेच लहान मुलांसोबत वाघोबाचे गाणे म्हणताना आणि लहान मूल होऊन नाचताना आपल्या कामात रममाण होताना दिसतात.

आपली अंगणवाडी सुंदर करण्यासोबत परसात भाजीपाला लावण्याची त्यांची इच्छा आहे. बालकांना निसर्गात रममाण होता यावे आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आदर्श शिक्षिका होण्यासाठी शाळेतील नोकरीच असावी लागते असे नाही, तर शिकणारा आणि शिकविणाऱ्यांत विश्वासाचे-स्नेहाचे नाते निर्माण होणे गरजेचे असते. सुनीता पावरा यांच्या अंगणवाडीत हेच पाहायला मिळत असल्याने, तेथील मुले नक्कीच पुढे चांगले शिक्षण घेतील.

गावाची सरपंच होऊन शिक्षणाला महत्त्वाचे स्थान मिळवून द्यायचे आहे. गावातील प्रत्येक मुला-मुलीने चांगले शिक्षण घ्यायला हवे आणि त्यासाठी इमारत आणि परिसरही सुंदर हवा. आपल्या परीने जे शक्य आहे, ते निश्चित करीन.

- सुनीता पावरा, अंगणवाडीसेविका, रेवानगर, ता.तळोदा

जन्माला आल्यानंतर मुलीचे वजन अत्यंत कमी होते. प्रकृती खालावत होती. सुनीताबाईंनी आम्हाला समजावले. त्यांनी आग्रह धरल्याने डॉक्टरांकडे मुलीचे उपचार करणे शक्य झाले. आता ती तिसरीच्या वर्गात आहे.

- चिमणा पावरा, ग्रामस्थ, रेवानगर, ता.तळोदा